
Why is World Twins Day celebrated Know its unique history and importance
World Twins Day 2025 History & Significance : आजच्या ग्लोबलाइज्ड जगात जुळे(Twins) म्हणजे फक्त दोन सारखे दिसणारे व्यक्ती नव्हेत, तर ते अनोख्या नात्याचे, भावनिक बंधाचे आणि जैविक चमत्काराचे प्रतीक आहेत. म्हणूनच दरवर्षी १८ डिसेंबरला साजरा केला जाणारा राष्ट्रीय जुळे दिन (National Twins Day) या नात्यास समर्पित दिवस मानला जातो. पण जागतिक जुळे दिन (World Twins Day) हा २४ नोव्हेंबर लाच साजरा केला जातो. २०१९ पूर्वी राष्ट्रीय जुळे दिन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी साजरा करण्यात येत असे. परंतु, वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि सार्वजनिक सहभाग लक्षात घेऊन हा दिवस अधिकृतरित्या १८ डिसेंबरला निश्चित करण्यात आला.
या दिवसाच्या इतिहासात एक प्रेरणादायी घटना दडलेली आहे. मोशे आणि आरोन विल्कॉक्स, ही जुळी भावंडे होती ज्यांनी १८१९ मध्ये अमेरिकेतील मिलविले नावाच्या शहराला सहा एकर जमीन दान केली. त्याच्या बदल्यात शहराचे नाव बदलून “Twinsburg” असे ठेवण्यात आले. याच शहरात पुढे राष्ट्रीय जुळे दिनाची परंपरा जन्माला आली. साहित्य, लोककथा आणि अगदी बायबलमध्येही जुळ्यांचा उल्लेख आहे. बायबलमधील एसाव आणि याकोब ही जगातील सर्वप्रथम नोंदवलेली जुळी भावंडे मानली जातात.
हे देखील वाचा : Swarnagiri Venkateswara Temple : देव भेटतो तिथे!’असा’ अलौकिक चमत्कारातून झाला जन्म पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या स्वर्णगिरी मंदिराचा
१९७६ मध्ये Twinsburg शहरात पहिला जुळे महोत्सव आयोजित करण्यात आला. त्या वर्षी फक्त ३६ जुळ्या जोड्यांनी सहभाग घेतला होता. पुढच्या वर्षी या महोत्सवाला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे तो वार्षिक स्वरूपात साजरा करण्यात आला आणि त्यातूनच National Twins Day Festival जन्माला आला. गेल्या ४ दशकांमध्ये या महोत्सवात सहभागींची संख्या प्रचंड वाढली असून आतापर्यंत ७७,००० पेक्षा अधिक जुळे या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार हा महोत्सव आज जगातील सर्वात मोठा वार्षिक जुळे मेळावा मानला जातो.
प्रत्येक वर्षी या महोत्सवाची खास थीम ठेवण्यात येते. काही प्रमुख थीम्स:
आज हा कार्यक्रम जागतिक पातळीवर प्रसिद्ध असून अनेक देशातील जुळे या विशेष दिवशी सहभागी होण्यासाठी येतात.
हे देखील वाचा : Utqiagvik : अमेरिकेचा ‘हा’ भाग आता अंधारात बुडाला; २ महिने उगवणारच नाही सूर्य, जाणून घ्या यामागील रंजक वैज्ञानिक कारण
जुळ्यांचे नाते जन्मापासून एक अनोखा मानसिक, भावनिक व सामाजिक बंध निर्माण करते. या दिवसाचा उद्देश:
Ans: 24 नोव्हेंबरला.
Ans: अमेरिकेतील Twinsburg शहरात.
Ans: जुळ्यांच्या अनोख्या बंधाचा सन्मान करण्यासाठी.