स्वर्णगिरी वेंकटेश्वर मंदिर: स्वर्गभूमीवर उभे असलेले आधुनिक तिरुमला,जाणून घ्या इतिहास-चमत्कार अन् आर्किटेक्चरबद्दल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Swarnagiri Venkateswara Temple : हैदराबादजवळील(Hyderabad) भुवनगिरी येथे उभे असलेले स्वर्णगिरी वेंकटेश्वर स्वामी मंदिर (Swarnagiri Venkateswara Swamy Temple) म्हणजे केवळ एक देवस्थान नाही, तर आधुनिक भारतातील स्थापत्यकलेचा प्रतीकात्मक चमत्कार आहे. याला यदाद्री तिरुमला देवस्थानम म्हणूनही ओळखले जाते. २२ एकरांवर पसरलेले हे देवस्थान पाहताच पहिली भावना एकच “हे मंदिर जणू स्वर्गातून पृथ्वीवर उतरले आहे!”
मंदिराचे सौंदर्य दूरूनच डोळे खिळवते. चोल, पल्लव, चालुक्य आणि विजयनगर स्थापत्यशैलीचे मिश्रण या मंदिराला अत्यंत अद्वितीय ओळख देतात. मंदिराच्या चारही बाजूंना भव्य राजगोपुरम असून आत जाताच विशाल मंडप, आकर्षक कोरीवकाम आणि दिव्य वातावरण हा अनुभव अविस्मरणीय बनवतो. गर्भगृहातील भगवान वेंकटेश्वराची १२ फूट उंच भव्य प्रतिमा ही तेलंगणातील सर्वात मोठी मानली जाते. त्याच्यावर उभारलेले पाच मजली विमान गोपुरम हा या जागेचा आध्यात्मिक मुकुटच जणू.
हे देखील वाचा : Shrinathji Temple : राजस्थानातील नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन; जाणून घ्या यामागील रंजक लोककथा
या मंदिरामागील सर्वात भावनिक घटना म्हणजे याचे संस्थापक उद्योगपती मानेपल्ली रामा राव आणि त्यांच्या पत्नी विजयलक्ष्मी यांच्या आयुष्यात घडलेला वैद्यकीय चमत्कार. गंभीर अपघातानंतर त्यांच्या पत्नी कोमात गेल्या होत्या आणि डॉक्टरांनी आशा सोडली होती. मात्र तिरुपतीहून आलेल्या पवित्र जलानंतर त्यांची प्रकृती चमत्कारिकरीत्या सुधारली. या अनुभवानंतर कृतज्ञतेने त्यांनी स्वतःच्या भूमीवर भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला आणि सात वर्षांत स्वर्णगिरी मंदिराची उभारणी पूर्ण झाली.
video credit : social media and @karbharibhau
हे देखील वाचा : देवालाही थंडी वाजते….पुण्यातील या मंदिरात हिवाळ्यात गणपतीला घातले जातात कपडे, गोंडस रूप पाहूनच मन मोहित होईल
| प्रकार | वेळ |
|---|---|
| मंदिर उघडण्याची वेळ | सकाळी ५:०० |
| अभिषेक व भूपाली | ५:०० ते ६:३० |
| दुपार विश्रांती | १२:३० ते १:३० |
| महाप्रसाद व नैवेद्य | १:३० ते २:३० |
| शेजारती | रात्री ९:०० |
पावसाळा व हिवाळा कारण पावसाळ्यात हिरवीगार टेकडी मंदिराभोवती स्वर्गीय दृश्य निर्माण करते.
Ans: हे मंदिर भुवनगिरी, तेलंगणा येथे आहे, हैदराबादपासून ४७ किमीवर.
Ans: सामान्य दर्शन मोफत आहे, परंतु विशेष दर्शनासाठी तिकिटे उपलब्ध.
Ans: पावसाळा आणि हिवाळा हा सर्वोत्तम काळ.






