Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Woman Awards : कर्तृत्वान महिलांचा ‘नवराष्ट्र’कडून सन्मान; मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

नवभारत वृत्तसमुहाच्या दैनिक नवराष्ट्रच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 27, 2025 | 12:16 PM
Navarashtra Woman Awards : कर्तृत्वान महिलांचा ‘नवराष्ट्र’कडून सन्मान; मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
Follow Us
Follow Us:

पुणे : स्त्रीच स्त्रीची शत्रू असते, या मताशी मी सहमत आहे. परंतु स्त्रियांनी एकमेकींना साथ देऊन प्राेत्साहीत केले पाहीजे असे मत बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले. तसेच गरजवंताना काय देता येईल याचाही विचार करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नवभारत वृत्तसमुहाच्या दैनिक नवराष्ट्रच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुनंदा पवार यांनी ‘महिलांचा सन्मान आणि महिला सक्षमीकरण’ या विषयी भाष्य केले. या प्रसंगी व्यासपीठावर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले हे उपस्थित हाेते. दैनिक नवराष्ट्रच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘तेजाेत्सव’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले.

पुरस्कारार्थी पाेलिस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे यांनी मांडलेल्या मताचा संदर्भ घेत सुनंदा पवार म्हणाल्या, ‘‘स्त्रीच स्त्रीची शत्रू असते यावर मी सहमत आहे परंतु स्त्रियांनी स्त्रियांना साथ देऊन प्रोत्साहित केले पाहिजे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.’’ महीलांच्यासंदर्भात ट्रस्टमार्फत केल्या जाणाऱ्या कामाची माहीती सुनंदा पवार यांनी दिली, त्या म्हणाल्या,‘‘  आम्ही सुरु केलेल्या अकादमी मध्ये महाराष्ट्रात ६०० हून अधिक महिला पोलिस अधिकारी बनल्या आहेत. २००८ पासून पुण्यात भीमथडी जत्रा कार्यक्रम आयोजित करतो. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात संस्कृती आणि ग्रामीण विकासासोबतच महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले जाते. ’’

महिला समर्थपणे सांभाळतात जबाबदारी

अभिनेत्री प्राजक्ताने राजमाता जिजाऊ, राणी येसुबाई यांच्या कार्याचा उल्लेख करीत स्त्री शक्ती काय करू शकते हे विषद केले. ‘‘स्त्री ही अशी शक्ती आहे, जी उंबऱ्याच्या आत आणि उंबऱ्याच्या बाहेरील जबाबदारी समर्थपणे सांभाळते. मला एक स्त्री असल्याचा अभिमान आहे. अशा पुरस्कारांमुळे महिलांना अजून काम करण्यास ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळते,’’ असे प्राजक्ताने नमूद केले. तर मेघराजराजे भोसले यांनी नवभारत आणि नवराष्टच्यावतीने महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविल्या जाणऱ्या उपक्रमांचे काैतुक करीत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या पुर्वार्धात पुरस्कार विजेत्यांपैकी काही महीलांनी चर्चासत्रात त्यांच्या खडतर प्रवासाबद्दल, कुटुंबाचे पाठबळ, स्वतःचे चांगले वाईट अनुभव सांगितले. सोबतच पुरस्कार मिळाल्याने पुढे काम करण्याचा आत्मविश्वास मिळतो असे त्यांनी नमूद केले.

आपल्या घरातील ज्या वस्तू गरजेच्या नाही त्या गरजू व्यक्तींना दया कारण आपल्या घरातली अडगळ हि कोणाच्या तरी घरातली गरज भागवू शकते. पेहलगाम च्या घटनेनंतर जीवन क्षणभंगूर आहे हे समजले. यामुळे जगण्यासोबत आपण समाजाचा हि विचार केला पाहिजे. असंही ते म्हणाले.

Web Title: Women of merit have been honored on behalf of navrashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • Navarashtra Update
  • Pune
  • pune news
  • Sunanda Pawar

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
2

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
3

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
4

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.