Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Diabetes Day 2025 : डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे काय? जाणून घ्या कोणाला जास्त धोका आणि कसे कराल संरक्षण

World Diabetes Day : एका सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की दुबईमध्ये झोरा सिद्धूची गळा चिरून हत्या करण्यात आली. बिश्नोईच्या सूचनेनुसार सिद्धू टोळीचा हँडलर म्हणून काम करत असल्याचा आरोप आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 14, 2025 | 09:04 AM
world diabetes day 2025 diabetic nephropathy risk and protection tips

world diabetes day 2025 diabetic nephropathy risk and protection tips

Follow Us
Close
Follow Us:
  1. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) 30-40% मधुमेही रुग्णांना मूत्रपिंड विकारांचा धोका.
  2. रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवणे : डायबेटिक नेफ्रोपॅथी रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय.
  3. अस्वास्थ्यकर जीवनशैली, लठ्ठपणा, धूम्रपान आणि दीर्घकाळचा मधुमेह : मूत्रपिंड बिघाडाचे मुख्य कारण.

World Diabetes Day 2025 : दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी ‘जागतिक मधुमेह दिन’ (World Diabetes Day) साजरा केला जातो, ज्याचा प्रमुख उद्देश म्हणजे जगभर झपाट्याने वाढणाऱ्या मधुमेहाबद्दल जनजागृती करणे. अनियमित जीवनशैली, चुकीचे आहारमान आणि सतत वाढणारा ताण यामुळे आज मधुमेह हा वैश्विक आरोग्यसंकट ठरला आहे. भारतात तर या आजाराचे प्रमाण इतक्या वेगाने वाढत आहे की देशाला “जगातील मधुमेहाची राजधानी” असेही म्हटले जाते. ICMR च्या अहवालानुसार भारतात तब्बल १० कोटींपेक्षा अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत, आणि ही संख्या आगामी वर्षांत आणखी वाढेल, असे तज्ज्ञ सतत सांगतात. मात्र केवळ मधुमेहच नाही, तर त्यातून होणारे दुष्परिणामही अधिक चिंताजनक आहेत—विशेषतः मूत्रपिंडांवरील ताण.

मधुमेह आणि मूत्रपिंडाचा ‘धोका’ नेमके नाते काय?

ज्येष्ठ एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. वसीम गोहारी यांच्या मते, ज्यांच्या रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ जास्त असते, त्यांच्यात मूत्रपिंड विकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. रक्तातील जास्त साखर शरीरातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना हळूहळू नुकसान पोहोचवते. ह्या अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांचे मुख्य कार्य म्हणजे रक्त शुद्ध करणे. परंतु साखर सतत वाढलेली राहिल्यास या रक्तवाहिन्या कमजोर होतात, गळू लागतात आणि त्यांची शुद्धीकरण क्षमता कमी होते. यालाच वैद्यकीय भाषेत डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 30-40% मधुमेही रुग्णांना मूत्रपिंडाच्या समस्या उद्भवतात, जे चिंतेचे कारण आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tehran Chaos : पाकिस्तानच्या सीमेवर ‘हा’ देश बांधणार आपली राजधानी; तेहरानमध्ये सध्या परिस्थिती अस्थिर

कोणाला जास्त धोका?

सर्व मधुमेही रुग्णांना मूत्रपिंडाचा आजार होतोच असे नाही, मात्र काही घटक धोका वाढवू शकतात

  • दीर्घकाळापासून असलेला मधुमेह
  • उच्च रक्तदाब
  • धूम्रपान
  • लठ्ठपणा
  • कुटुंबात मधुमेह किंवा मूत्रपिंड विकाराचा इतिहास
    काही अभ्यासांनुसार पुरुषांमध्ये हा धोका महिलांपेक्षा थोडा अधिक आढळतो.

डायबेटिक नेफ्रोपॅथी कशी टाळावी?

अमेरिकन डायबिटीज असोसिएशन स्पष्टपणे सांगते की,

रक्तातील साखर + रक्तदाब हे दोन्ही नियंत्रित ठेवणे हे मूत्रपिंडांचे सर्वात प्रभावी रक्षण आहे.

डॉक्टरांच्या मते, जीवनशैलीतील काही लहान बदल मोठा फरक घडवू शकतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ciel Dubai Marina : आकाशाला भिडणारी आलिशानता; ‘हे’ आहे दुबईतील 377 मीटर उंच आणि भव्यदिव्य हॉटेल

साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवा

नियमित तपासणी, वेळेवर औषधे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू ठेवणे अत्यावश्यक.

मीठाचे सेवन कमी करा

जास्त मीठामुळे रक्तदाब वाढतो आणि मूत्रपिंडांवर ताण येतो.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा

दररोज किमान ३० मिनिटे वेगाने चालणे किंवा व्यायाम

नियमित शारीरिक हालचाल शरीराची इंसुलिन संवेदनशीलता वाढवते.

आहारात हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य आणि फायबरयुक्त फळे

सफरचंद, पेरू, ओट्स, पालक यांसारखे पदार्थ मूत्रपिंडांसाठी फायदेशीर.

वर्षातून किमान एकदा किडनी फंक्शन टेस्ट

लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात.

महत्त्वाची सूचना

या लेखातील सर्व माहिती तज्ज्ञ व डॉक्टरांशी झालेल्या चर्चेवर आधारित असून, आणि तज्ञांनी पडताळणी केलेली आहे. तथापि, कोणत्याही प्रकारची वैद्यकीय समस्या असल्यास, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

Web Title: World diabetes day 2025 diabetic nephropathy risk and protection tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • Diabetics
  • how to cure Diabetes
  • world diabetes day

संबंधित बातम्या

रक्तातील साखरेची पातळी कायमच राहाल नियंत्रणात! रोज प्या एक कप ब्लॅक कॉफी, संपूर्ण शरीराला होतील भरमसाट फायदे
1

रक्तातील साखरेची पातळी कायमच राहाल नियंत्रणात! रोज प्या एक कप ब्लॅक कॉफी, संपूर्ण शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.