डायबिटीससाठी कोणती टेस्ट करणे महत्त्वाचे आहे
दीर्घकालीन रक्तशर्करा नियंत्रणासाठी मधुमेह असलेल्या लोकांनी नियमितपणे HbA1c चाचणी करणे आवश्यक आहे. HbA1cकिंवा ग्लायकेटेड हिमोग्लोबिन, ही एक अशी चाचणी आहे ज्यामध्येरक्तशर्करेची मागील दोन-तीन महिन्यातील सरासरी पातळी मोजली जाते. दैनंदिन चाचणीच्या तुलनेत याचाचणीमध्ये अधिक सखोल माहिती मिळत असल्याने मधुमेहाच्या काळजीसाठी ही चाचणी महत्वाची आहे. HbA1c पातळीची माहिती मिळाल्याने डॉक्टर आणि रुग्णाला मधुमेहाची काळजी कशाप्रकारे घेतली जात आहे हे समजते आणि काही बदल करणे आवश्यक आहे का हे लक्षात येते.
याबाबत अधिक माहिती दिली आहे डॉ. अजय शाह, न्यूबर्ग अजय शाह लॅबोरेटरीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी. तुम्हीही जर मधुमेही रूग्ण असाल तर तुम्ही हे वाचायलाच हवे. 14 नोव्हेंबर रोजी जगभरात डायबिटीस दिन साजरा करण्यात येतो. मधुमेहाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. सध्या डायबिटीस हा आजार इतका वाढला आहे की, याबाबत तुम्ही माहिती करून घेणे आवश्यक आहे (फोटो सौजन्य – iStock)
HbA1c चाचणी महत्त्वाची का?

टेस्ट करणे महत्त्वाचे का आहे
कालांतराने रक्तातील साखरेची वाढती पातळी,हृदय, रक्तवाहिन्या, मूत्रपिंड आणि डोळ्यांसह शरीराच्या विविध भागांना नुकसान पोहोचवू शकअसल्याने HbA1c चाचणी करणे महत्वाचे ठरते. नियमित चाचणीमुळे समस्या गंभीर होण्यापूर्वी लक्षात येणे शक्य होते. बहुतेक मधुमेही रूग्णांसाठी HbA1c पातळी 7% पेक्षा कमी ठेवण्याचे लक्ष असते, जे वय, आरोग्य आणि इतर घटकांवर अवलंबून असते. HbA1cपातळी या दरम्यान राहिल्यास अडचणी होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो, मधुमेह असलेल्या लोकांना निरोगी जीवन जगण्यास मदत होते.
हेदेखील वाचा – शरीरातील कोणकोणत्या भागांवर दिसतात डायबिटीसची लक्षणं? प्रत्येकाने जाणून घेणे महत्वाचे
साखरेची पातळी कळण्यासाठी
शारीरिक श्रम, तणाव आहार यामुळे रक्तशर्करेची पातळी रोज बदलू शकते त्यामुळे देखील HbA1cचाचणी महत्वाची ठरते. रक्तातील साखरेची पातळी एकदा पाहण्याने फक्त त्यावेळी असलेल्या रक्तशर्करेची माहिती देते, तर HbA1c चाचणीमध्ये रक्तातील साखरेचे योग्य नियंत्रण किती आठवडे आणि महिने केले गेले आहे हे समजते. यामुळे रुग्ण आणि डॉक्टर दोघांनाही एकूण प्रगती लक्षात येते आणि त्यानुसार औषधे, आहार यामध्ये बदल करणे किंवा व्यायाम वाढवणे यासारख्या उपाययोजना करणे शक्य होते.
कधी आणि किती वेळा करावी?

चाचणी कधी आणि किती वेळा करणे योग्य आहे?
HbA1cचाचणी किती वारंवार करायची हे बदलत असले तरीही बहुतेक मधुमेहिंनी वर्षातून किमान दोनदा तरी ही चाचणी करून घ्यावी. ज्यांचे योग्य प्रमाणात नियंत्रण नाही किंवा ज्यांच्या उपचारात नुकतेच बदल झाले आहेत अशा लोकांना दर तीन महिन्यांनी ही चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. नियमितपणे HbA1cचाचणी केल्याने समस्या लवकर लक्षात येऊन त्यावर वेळीच उपचार करणे शक्य होते.
नियंत्रणासाठी काय करावे
रक्तशर्करेची योग्य काळजी घेण्यासाठी, चाचणी बरोबरच आरोगयपूर्ण आहार, नियमित व्यायाम आणि औषधोपचार हेही अत्यंत महत्वाचे आहेत. HbA1c पातळीवर नियमितपणे लक्ष ठेवल्याने, केलेल्या प्रयत्नाना यश आल्याचे पाहून रुग्ण प्रोत्साहीत राहतात. यामुळे जीवनशैलीमध्ये बदल केल्याने त्यांच्या रक्तशर्करेमध्ये बदल होतो हे देखील त्यांच्या लक्षात येते.
नियमितपणे HbA1cकरणे मधुमेह रुग्णांसाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे रक्तशर्करेवर किती नियंत्रण आहे हे लक्षात येऊन आजार गंभीर होणे टाळण्यात मदत होते त्याच बरोबर आरोग्याची काळजी घेण्यात मदत मिळते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी, HbA1c पातळी निरोगी राखल्याने त्यांच्या एकूण आरोग्यामध्ये आणि जीवनाच्या गुणवत्तेत लक्षणीय फरक पडू शकतो.






