Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Emoji Day: शब्दांशिवाय बोलणारे ‘ते’ चिमुकले चेहरे! ‘जपान ते व्हॉट्सॲप…’ जाणून घ्या आपल्या लाडक्या इमोजीचा रंजक प्रवास

World Emoji Day : जागतिक इमोजी दिवस दरवर्षी १७ जुलै रोजी साजरा केला जातो. आपल्या डिजिटल संवादात इमोजींचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 17, 2026 | 10:41 AM
world emoji day 17 july calendar emoji history shigetaka kurita apple ical whatsapp trends

world emoji day 17 july calendar emoji history shigetaka kurita apple ical whatsapp trends

Follow Us
Follow Us:
  • डिजिटल संवादाचा राजा
  • जपानमधून सुरुवात आणि खास तारीख
  • अनेकता आणि सांस्कृतिक बदल

World Emoji Day 17 July 2026 : आजच्या डिजिटल युगात जर आपल्याला विचारले की, आपण एका दिवसात सर्वात जास्त काय वापरतो? तर त्याचे उत्तर नक्कीच ‘इमोजी’ (Emoji) हे असेल. व्हॉट्सॲपवर मित्राशी गप्पा मारणे असो, इन्स्टाग्रामवर रीलला दाद देणे असो किंवा फेसबुकवर एखाद्या पोस्टवर दुःख व्यक्त करणे असो आपल्या भावना शब्दांशिवाय अचूक पोहोचवण्याचे काम हे छोटे, रंगीबेरंगी चेहरे अत्यंत चपखलपणे करतात. याच डिजिटल क्रांतीचा आणि आपल्या संवादाला जिवंत करणाऱ्या या चिन्हांचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी १७ जुलै रोजी ‘जागतिक इमोजी दिन’ (World Emoji Day) साजरा केला जातो.

आजचा दिवस हा केवळ एक अनधिकृत सण नाही, तर तो आपल्या बदलत्या भाषेचा आणि मानवी जोडणीचा एक मोठा पुरावा आहे. जेव्हा शब्दांची कमतरता भासते किंवा लिहिलेला संदेश समोरच्याला कसा वाटेल याची भीती असते, तेव्हा एक छोटासा हसरा चेहरा (Smiley) संपूर्ण संभाषणातील ताण हलका करतो. कधीकधी एक छोटासा इमोजी हजार शब्दांपेक्षा जास्त भावना व्यक्त करून जातो.

मोबाईलच्या कॅलेंडर इमोजीवर ‘१७ जुलै’ची तारीख का असते?

तुम्ही कधी तुमच्या मोबाईलच्या कीबोर्डमधील कॅलेंडरच्या इमोजीकडे (📅) बारकाईने पाहिले आहे का? जर पाहिले असेल, तर त्यावर नेहमी ‘१७ जुलै’ हीच तारीख लिहिलेली दिसते. यामागे एक अत्यंत रंजक इतिहास आहे. सन २००२ मध्ये, याच दिवशी म्हणजेच १७ जुलै रोजी टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘Apple’ ने मॅक ओएस एक्स (Mac OS X) साठी आपले प्रसिद्ध ‘iCal’ कॅलेंडर ॲप्लिकेशन लाँच केले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kheibar Shekan: ऐतिहासिक नावाचे आधुनिक विध्वंसक इराणचे ‘ते’ घातक क्षेपणास्त्र; ज्याने US पॅट्रियट यंत्रणेचा केला कचरा

पुढे जेव्हा २०१४ मध्ये ‘इमोजीपिडिया’चे (Emojipedia) संस्थापक जेरेमी बर्गे (Jeremy Burge) यांनी ‘जागतिक इमोजी दिन’ साजरा करण्याचे ठरवले, तेव्हा त्यांनी कॅलेंडर इमोजीवर असलेल्या या तारखेची निवड केली. तेव्हापासून १७ जुलै हा दिवस अधिकृतपणे जागतिक इमोजी दिन म्हणून साजरा होऊ लागला आणि आज हा डिजिटल जगातील सर्वात लोकप्रिय ट्रेंड बनला आहे.

इमोजीचा उगम: जपानमधील तो १९९० चा काळ

इमोजीचा इतिहास हा तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीशी जोडलेला आहे. १९९० च्या दशकात जपानच्या ‘NTT DoCoMo’ या दूरसंचार कंपनीमध्ये काम करणाऱ्या शिगेताका कुरिता (Shigetaka Kurita) नावाच्या एका कर्मचाऱ्याने पहिला इमोजी तयार केला होता. त्यावेळी पेजर वापरणाऱ्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी १२×१२ पिक्सेलचे १७६ साधे चित्र-शब्द (Picture-Words) डिझाइन केले होते. जपानी भाषेत ‘इ’ (E) म्हणजे चित्र आणि ‘मोजी’ (Moji) म्हणजे शब्द किंवा कॅरेक्टर; यावरूनच ‘इमोजी’ हा शब्द अस्तित्वात आला.

सुरुवातीला केवळ जपानपुरता मर्यादित असलेला हा ट्रेंड २०१० मध्ये ‘युनिकोड’ (Unicode Consortium) च्या मान्यतेनंतर जगभर पसरला. आजच्या घडीला हजारो वेगवेगळ्या प्रकारचे इमोजी उपलब्ध असून दरवर्षी त्यात नवनवीन डिझाइन्सची भर पडत असते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jagannath Rath Yatra: हातात पाकिस्तानी झेंडा आणि मुखात हरिनाम! कराचीमध्ये रंगला हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव; VIDEO होतोय खूप VIRAL

सांस्कृतिक विविधता आणि भारतीय ‘नमस्ते’चा जलवा

गेल्या काही वर्षांत इमोजी केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नसून ते सामाजिक सर्वसमावेशकतेचे माध्यम बनले आहे. आता वापरकर्त्यांना वेगवेगळ्या त्वचा रंगांचे (Skin Tones), वेगवेगळ्या लिंगांचे आणि दिव्यांग व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणारे इमोजी वापरता येतात.

यामध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा ‘नमस्ते’ किंवा प्रार्थना करणारा इमोजी (जोडलेले हात) हा जगभरात अत्यंत लोकप्रिय आहे. भारतात हा इमोजी आदर व्यक्त करण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी किंवा देवाकडे प्रार्थना करण्यासाठी वापरला जातो; तर पाश्चात्त्य देशांमध्ये लोक याचा वापर ‘थँक्यू’ (धन्यवाद) किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतात. हाच बदल दर्शवतो की कसे हे चिमुकले आयकॉन्स भौगोलिक सीमा ओलांडून लोकांना एकमेकांशी जोडत आहेत.

Web Title: World emoji day 17 july calendar emoji history shigetaka kurita apple ical whatsapp trends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

World Gratitude Day: ‘धन्यवाद’ एका शब्दाची जादू बदलायला हवी जीवनशैली; जाणून घ्या 21 सप्टेंबरचे महत्त्व आणि आरोग्यदायी फायदे
1

World Gratitude Day: ‘धन्यवाद’ एका शब्दाची जादू बदलायला हवी जीवनशैली; जाणून घ्या 21 सप्टेंबरचे महत्त्व आणि आरोग्यदायी फायदे

National Chai Day: केवळ पेय नाही तर भावना! राजघराण्यांपासून गल्लीबोळातील टपरीपर्यंत ‘असा’ आहे आपल्या लाडक्या चहाचा रंजक इतिहास
2

National Chai Day: केवळ पेय नाही तर भावना! राजघराण्यांपासून गल्लीबोळातील टपरीपर्यंत ‘असा’ आहे आपल्या लाडक्या चहाचा रंजक इतिहास

RPF Raising Day : कोट्यवधी प्रवाशांचे सुरक्षा कवच! जाणून घ्या ‘रेल्वे संरक्षण दल’ स्थापना दिनाचा इतिहास, महत्त्व आणि विशेष मोहिमा
3

RPF Raising Day : कोट्यवधी प्रवाशांचे सुरक्षा कवच! जाणून घ्या ‘रेल्वे संरक्षण दल’ स्थापना दिनाचा इतिहास, महत्त्व आणि विशेष मोहिमा

World  Cleanup Day: एस्टोनियातील ‘या’ एका कल्पनेने बदलले जग; जाणून घ्या 20 सप्टेंबरचे महत्त्व आणि इतिहास
4

World Cleanup Day: एस्टोनियातील ‘या’ एका कल्पनेने बदलले जग; जाणून घ्या 20 सप्टेंबरचे महत्त्व आणि इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.