Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Eye Donation Day : अंधत्वावर आशेचा किरण! नेत्रदानाला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

World Eye Donation Day 2026 : अंधत्वावर मात करण्यासाठी नेत्रदान महत्त्वाचे ठरत आहे. लोकांमध्ये याबाबत जागरुकता वाढत असून पुण्यातून सर्वाधिक नेत्रबुबुळ संकलन दिसून आले आहे. नेत्रदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती अंधारातून प्रकाशाकडे नेणारी मानवी साखळी आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 10, 2026 | 01:23 PM
World Eye Donation Day

World Eye Donation Day

Follow Us
Follow Us:
  • अंधत्वावर आशेचा किरण
  • पुण्यातून नेत्रदानाला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
  • २०२३–२४ मध्ये सर्वाधिक संकलानाची नोंद
World Eye Donation Day : सुनयना सोनवणे : जग पाहण्याचा अनुभव प्रत्येकासाठी सारखा नसतो. कुणासाठी तो रोजचा साधा अनुभव असतो, तर कुणासाठी आयुष्यभराची प्रतीक्षा. त्या प्रतीक्षेला उत्तर ठरू शकतो तो एका अनोळखी व्यक्तीचा नेत्रदानाचा निर्णय. एका कुटुंबासाठी दुःखाचा क्षण असताना, त्याचवेळी दुसऱ्या कुणाच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश परतण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच नेत्रदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती अंधारातून प्रकाशाकडे नेणारी मानवी साखळी आहे.

World Ocean Day : पुण्याच्या प्रदूषणाचा फटका महासागरांना? पर्यावरण अहवालातून मोठा इशारा

दरवर्षी १० जून रोजी जागतिक दृष्टिदान दिन साजरा केला जातो. सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ‘दृष्टिदान दिन’ म्हणून ओळखला जातो. अंधत्वाविषयी जनजागृती वाढवणे आणि अधिकाधिक नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा हा या दिवसामागील प्रमुख उद्देश आहे.

नेत्रदानातून दृष्टीची नवी संधी

देशात आणि राज्यात नेत्रदान चळवळीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असताना पुणे जिल्ह्यातही मागील काही वर्षांत नेत्रबुबुळ (कॉर्निया) संकलनात सातत्य दिसून येत आहे. नेत्रदानातून मुख्यतः कॉर्नियाचा वापर प्रत्यारोपणासाठी केला जातो. कॉर्नियाच्या समस्येमुळे दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची संधी मिळू शकते. एका व्यक्तीच्या नेत्रदानातून किमान दोन व्यक्तींना दृष्टी मिळण्याची शक्यता असते.

देशभरातील नेत्रपेढ्या

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृश्यदोष नियंत्रण कार्यक्रमांतर्गत देशात नेत्रपेढ्या आणि कॉर्निया प्रत्यारोपण सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा, उपकरणे, प्रशिक्षण आणि जनजागृतीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. देशभरात सध्या ३९६ नेत्रपेढ्या कार्यरत आहेत.

पुण्यात नेत्रदानाबाबत जागरुकता

पुणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांत जिल्ह्यात नेत्रबुबुळ संकलनात सातत्य दिसून आले आहे. विशेषतः २०२३–२४ या वर्षात सर्वाधिक १,२२६ नेत्रबुबुळ संकलनाची नोंद झाली असून ७७१ केरॅटोप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडल्या. यावरून जिल्ह्यात नेत्रदानाबाबत जागरूकता वाढत असल्याचे चित्र दिसून येते.

नेत्रदानाबाबत गैरसमज दूर करण्याची गरज

तज्ज्ञांच्या मते, नेत्रदानाबाबत अजूनही समाजात अनेक गैरसमज आहेत. मात्र चष्मा वापरणारे, मोतीबिंदू झालेले किंवा अनेक सामान्य आरोग्य स्थिती असलेले नागरिकही अनेकदा नेत्रदानासाठी पात्र असू शकतात. त्यामुळे अधिक जनजागृती आणि कुटुंबीयांमध्ये या विषयावर संवाद वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

देशातील नेत्रदान

देशभरात कार्यरत नेत्रपेढ्या ३९६
२०२२–२३ ६२,३७० कॉर्निया संकलन
२०२३–२४  ६६,४३४ कॉर्निया संकलन
२०२४-२५ ६९,८४८ कॉर्निया संकलन

पुणे जिल्ह्यातील मागील पाच वर्षांचा नेत्रबुबुळ संकलन आढावा

वर्ष लक्ष्य संकलन लक्ष्यपूर्ती  शस्त्रक्रिया
२०२१-२२ १,३०० ९३६ ६६.९% ६६९
२०२२-२३ १,३०० ९६२ ६४.२% ६४२
२०२३-२४ १,०४० १,२२६  ७७.१% ७७१
२०२४-२५ १,१८८ १,१७० ७०.४% ७०४
२०२५-२६ १,१८८ १,०९६ ६८.४% ६८४

(२०२३–२४ मध्ये सर्वाधिक नेत्रबुबुळ संकलनाची नोंद)

World Eye Donation Day : मृत्यूनंतरही कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश आणण्याची सुवर्णसंधी; या दिनानिमित्त घ्या महत्त्वाचा संकल्प

Web Title: World eye donation day 2026 eye donation awareness response

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • eyes health

संबंधित बातम्या

महिलांसाठी महत्त्वाची माहिती; PMOS मुळे डोळ्यांनाही धोका वाढू शकतो, काय आहे तज्ज्ञांचा इशारा?
1

महिलांसाठी महत्त्वाची माहिती; PMOS मुळे डोळ्यांनाही धोका वाढू शकतो, काय आहे तज्ज्ञांचा इशारा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.