World Post Day
World Post Day : दरवर्षी ०९ ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. १९७४ साली स्वित्झर्लंडच्या बर्न येथे युनिव्हर्सल पोस्ट युनियन (UPU) या आंतरराष्ट्रीय संस्थेची आज स्थापना झाली होता. याच निमित्त जगभरात ०९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो. या संस्थेच्या माध्यमातूनच जगभरातील देशांमध्ये टपाल सेवेचे नियम, दर आणि व्यवस्था निर्माण झाली. यामुळे पत्र, पार्सल किंवा माहिती जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवणे शक्य झाले. आज आपण या जागतिक टपाल दिनानिमत्त आपल्या भारतात टपाल व्यवस्था कशी सुरु झाली हे जाणून घेणार आहोत.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारताच्या टपाल व्यवस्थेचा इतिहास खूप जुना आहे पूर्वी राजा महाराजांच्या काळाच संदेश पोहोचवण्यासाठी राजदूत, धावक, घोडेस्वार यांचा वापर केला जात होता. दिल्लीच्या कुतुबुद्दीन ऐबकने आपल्या शासनकाळात संदेशवाहक व्यवस्थेला सुरु केली होती, जी व्यवस्था पुढे अल्लाउद्दीन खिलजी आणि शेरशाह यांनी विस्तारीत केली. तसेच मुघल सम्राट अकबरनेही उंट आणि धावक यांना उपयोग केल आणि डाक सुविधा अधिक विस्तारत गेली.
भारतात आधनिक टपाल सुविधेची पायाभरणी ही ब्रिटीश काळात झाला. १ ऑक्टोबर १८५४ रोजी लॉर्ड डलहौसी याने भारतीय टपाल विभागाची सुरुवात केली होती. याच दिवशी भारताचा टपाल दिवस साजरा केला जातो. या दिवशी भारतातने पहिले टपाल तिकीटही जारी केली होते. ज्यावर महाराणी व्हिक्टोरियाचे चित्र होते. पुढे भारत स्वातंत्र्य झाला आणि टपाल सुविधा भारतीयांच्या नियंत्रणाखाली आली.
यानंतर भारत सरकारमे सर्मसामान्य लोकांसाठी अधिक सुलभ आणि उपयुक्त टपाल सेवेची सुरुवात केली. स्वतंत्र भारताचे पहिले टपाल तिकीट हे १५ ऑगस्ट १९४७ म्हणजेच भारतच स्वतंत्र्य झाला त्या दिवशी प्रसिद्ध झाले होते. या टपाल तिकीटावर “जय हिंद” लिहिलेले आणि तिरंगा झेडा होता. यानंतर भारताच्या टपाल विभागाने संस्कृती, परंपरा, विज्ञान, कला दाखवणारी सुंदर तिकीटे जारी केली.
आजच्या डिजिटल युगात ई-मेल, व्हॉट्सॲप, व्हिडिओ कॉलिंग, सोशल मीडिया यामुळे पत्रलेखनाची परंपरा कमी झाली आहे. पण आजही भारतात टपाल विभागाचे महत्त्व कायम आहे. यामध्यमातून नागरिकांपर्यंकत कुरियर, पार्सल, स्पीड पोस्ट, आधार सेवा आणि ई-कॉमर्स वितरण केले जाते. अशा प्रकारे आपल्या भारतात टपाल सेवा सुरु झाली होती.
जगातिक टपाल दिन हा आपल्याला संवाद, विश्वास आणि जगभरातील लोकांना एकत्र जोडण्याची संधी देतो. पत्र हे केवळ कागदावरील शब्द नसतात, तर भावना , नातेसंबंध आणि आठवणींचा पिटारा असतो. आजच्या दिनादिवशी या सेवेद्वारे लोकांना एकत्र आणणाऱ्या संस्थेचा गौरव करणे. तसेच पत्रलेखनाचे आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित करणे आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा