World Teachers Day 2025 : भारतात ५ सप्टेंबर, पण जगभरात ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो शिक्षक दिन; जाणून घ्या महत्त्व आणि थीम (फोटो सौजन्य: iStock)
World Teachers Day : भारतात आपण दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो. भारताचे दुसरे राष्ट्रपती, महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. पण जगभरात दरवर्षी हा दिवस ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. UNESCO द्वारे याची सुरुवात करण्यात आली होती. हा दिवस जगभरातील शिक्षकांच्या योगदानाच्या सन्मानासाठी नव्हे, तर त्यांच्यासमोरील आव्हाने, शिक्षणातील सुधारणा यांसारख्या आवश्यक बदलांवर चर्चा करण्याचा एक महत्त्वपूर्ण संधी प्रदान करतो.
जागतिक शिक्षक दिनाची सुरुवात ही १९९४ मध्ये झाली. या शिक्षक दिनाअंतर्गत शिक्षकांचे हक्क, जबाबदाऱ्या, प्रशिक्षण आणि कामाच्या परिस्थितीसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे आहे. याची आंतरराष्ट्रीय शिफारस १९६६ मध्ये करण्यात आली होती. यानंतर यामध्ये १९९७ मध्ये उच्च शिक्षणात सहभागी असलेल्या शिक्षकांचा समावेश करण्यात आला.
आई-वडिलानंतर मुलांच्या जीवनाला कलाटणी देण्याचे काम शिक्षकच करतो. शिक्षक मुलांमध्ये समानता, नावीन्याची बीजे पेरतो. मुलांना स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्याचे धाडस शिकवतो. पण अनेकदा त्यांना आदर, संधी, पाठिंबा न मिळाल्याने शिक्षण व्यवस्थेत कमकुवतपण येऊ शकतो.
यामुळे हा जागतिक शिक्षक दिन शिक्षणाला आणि शिक्षकांच्या सहकार्याला नव्या उंचीवर नेण्यासाठी आवश्यक आहे. यामुळे शिक्षक त्यांच्यासमोरील आव्हांना सर्वांसमोर मांडू शकतील आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे चर्चा करु शकतील. यामुळे त्यांना मुलांचे आणि समाजाचे मार्गदर्शन करता येईल.
दिनविशेष ५ ऑक्टोबर : जाणून घ्या आजच्या दिवशी जगभरात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
या वर्षी जागतिक शिक्षक दिनाची थीम ही, ‘शिक्षणाला सहयोग व्यवसाय म्हणून पुन्हा निश्चित करणे” आहे. यामुळे शिक्षकांना त्यांच्या व्यवसायात दिर्घकाळ टिकून राहता येईल. त्याच्यासमोर असलेले अडथळे दूर करणे आणि त्यांची गुणवत्ता वाढवणे हे देखील याचे उद्दिष्ट आहे.
या द्वारे जगभराकत शिक्षणाला रुपांतर करायचे असेल तर वैयक्तिक भागीदारी आणि सहकार्यात रुपांतर केले पाहिजे असा संदेश देणे. यामुळे शिक्षक विचारांची देवाण-घेवाण करतील, एकमेकांना पाठिंबा देतील आणि जबाबादाऱ्या वाटून समाजाला प्रभावी व प्रेरणादायी शिक्षण देतील.