Gandhi Jayanti 2025 : फाळणीच्या दोन वर्षानंतर पाकिस्तान भेटीची गांधीजींनी आखली होती योजना; पण 'त्या' घटनेमुळे राहिली अपूर्ण(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आज भारतासाठी अत्यंत खास दिवस आहे. आज आपले लाडके बापू म्हणजे महात्मा गांधी यांचा जन्मदिवस आहे. आजा आपण त्यांची १५६वीं जयंती साजरी करत आहोत. महात्मा गांधींनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांचा जन्मदिवस हा गांधी जयंती म्हणून सादरा केला जातो. गांधीचे विचार आणि त्यांची जीवनशैली आजही जगाला प्रेरणा देतात. गांधीजींना आपल्या देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य देशाला समर्पित केले होते. पण त्या एका घटनेने संपूर्ण इतिहास बदलला, जेव्हा भारताने आपल्या महान नेत्याला गमावले. तो म्हणजे त्यांच्या मृत्यूचा दिवस. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण जगाला मोठा धक्का बसला होता. तसेच मृत्यूपूर्वी गांधीजींची एक इच्छाही अपूर्ण राहिली होती, जी भारत आणि पाकिस्तानच्या हितासाठी होती. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
30 जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्ली येथे महात्मा गांधींची प्रार्थना सभेदरम्यान हत्या करण्यात आली होती. उजव्या विचारसरणीच्या हिंदू राष्ट्रवादी नथुराम गोडसे या व्यक्तीने गांधीजींवर गोळ्या झाडून हत्या केली होती. गांधीजीं मूत्यूपूर्वी पाकिस्तानला जाणार होते. गांधीजींच्या या दौऱ्याचा उद्देश भारत आणि पाकिस्तान फाळणीनंतर सुरु असलेला हिंसाचार थांबवणे, तसेच अल्पसंख्यांकामधील सुरक्षिततेची भावना निर्माण करणे होता. फाळणीनंतर पाकिस्तानमधील अल्पसंख्यांत हिंदू आणि भारतातील अल्पसंख्यांक मुस्लिम नागरिकांना मोठ्या प्रमाणात अत्याचार सहन करावा लागला होता.
हा अत्याचार थांबवण्याच्या हेतूनेच गांधीजी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होते. महात्मा गांधीना वाटत होते की, त्यांनी पाकिस्तानला जाऊन लोकांशी संवाद साधला तर तणाव कमी होईल. यामुळेच त्यांनी पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मोहम्मद अली-जिन्ना यांच्याकडे आपली तळमळ व्यक्त केली होती. ज्याला जिन्ना यांनी सहमती दर्शवली होती. महात्मा गांधीजी यांचा पाकिस्तानला जाण्याचा हेतू राजकीय आणि मानवतेच्या बंधुत्त्वाचा होता.
त्यांच्या दृष्टीने हिंदू-मुस्लिम ऐक्य हीच खरी ताकद होती. पण आजही त्यांना भारतात काहीजण मुस्लिमांचे पक्षपाती म्हणून आरोप करतात. यामुळे त्यांनी पाकिस्तानमध्ये प्रत्यक्षात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचे आणि पुन्हा एकदा दोन्ही देशातील जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा होता. फाळणी दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये मालमत्ता व आर्थिक वाटणीबाबत वाद निर्माण झाला होता. पाकिस्तानला भारत सरकारने ५५ कोटींची देय रक्कम विलंबाने देण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे पाकिस्तानींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी उत्पन्न झाली होती. भारताच्या या निर्णयाचा गांधींनी निषेधही केली होता.
अपूर्ण राहिली भारत पाकिस्तानला एकत्र आणण्याची इच्छा
गांधींचा पाकिस्तानला दौरा निश्चितही झाला होता. पण ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्यामुळे त्यांची हिंदू-मुस्लिम ऐक्याची इच्छा अपूर्ण राहिली. आजही पाकिस्तानच्या संसदेत महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहली जाते. पंतप्रधान लियाकत अली खान यांनी त्यांना त्या काळातील सर्वात महान नेता म्हणून गौरवले होते.
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा