Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Rat Day: कुठे शुभ तर कुठे अशुभ, जाणून घ्या ‘या’ इवल्याश्या प्राण्यासंबंधित काही रंजक गोष्टी

जगभरात वेगवेगळ्या प्राण्यांना विशिष्ट मान्यता आणि श्रद्धा असते. काही प्राणी शुभ मानले जातात, तर काहींना अशुभ समजले जाते. अशाच एका प्राण्याचा आज जागतिक स्तरावर गौरव केला जातो, तो म्हणजे उंदीर!

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 04, 2025 | 09:00 AM
World Rat Day Fascinating rat tales and 75 years of India ties

World Rat Day Fascinating rat tales and 75 years of India ties

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जगभरात वेगवेगळ्या प्राण्यांना विशिष्ट मान्यता आणि श्रद्धा असते. काही प्राणी शुभ मानले जातात, तर काहींना अशुभ समजले जाते. अशाच एका प्राण्याचा आज जागतिक स्तरावर गौरव केला जातो, तो म्हणजे उंदीर! दरवर्षी ४ एप्रिलला ‘जागतिक उंदीर दिन’ (World Rat Day) साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश पाळीव प्राण्यांमध्ये उंदराचा समावेश करणे आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव करून देणे हा आहे.

उंदीर हा एक खेळकर आणि हुशार प्राणी आहे. तो भगवान गणपतींचे वाहन म्हणून पूजला जातो, तर दुसरीकडे युरोप आणि इतर काही देशांमध्ये तो अशुभ मानला जातो. पौराणिक कथा, वैज्ञानिक संशोधन, आणि जीवनशैली या तिन्ही अंगांनी उंदरांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उंदीरांबद्दल अनेक रंजक गोष्टी आहेत ज्या ऐकून तुम्हाला नवल वाटेल!

उंदरांची पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्वता

भारतीय संस्कृतीत उंदरांना विशेष स्थान आहे. गणपती बाप्पांचे वाहन म्हणून त्यांची पूजा केली जाते. विशेषतः राजस्थानमधील ‘करणी माता मंदिर’ उंदरांसाठी प्रसिद्ध आहे. येथे हजारो उंदीर मोकळेपणाने फिरतात आणि त्यांना अन्न दिले जाते. भक्त याला शुभ मानतात आणि प्रसाद म्हणून ते उंदरांनी खाल्लेले अन्न ग्रहण करतात.

तर, याउलट युरोप, अमेरिका आणि इतर अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये उंदरांना अशुभ मानले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे ‘ब्लॅक डेथ’ या महाभयंकर प्लेगच्या साथीला जबाबदार ठरलेले उंदीर. १४व्या शतकात युरोपमध्ये या साथीमुळे कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे उंदरांना तिथे आजही भीती आणि तिरस्काराने पाहिले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारताला $3.1 बिलियनचे नुकसान; अहवालात दावा

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि औषध चाचणीतील योगदान

उंदीर हे अत्यंत हुशार आणि विज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्राणी आहेत. औषध आणि लसींवर मानवावर चाचणी घेण्यापूर्वी ती उंदरांवर केली जाते. त्यामुळे वैद्यकीय संशोधनासाठी उंदीर अनमोल ठरले आहेत. त्यांचा मेंदू आणि शरीर विज्ञान मानवासारखा असतो, त्यामुळे औषधांची परिणामकारकता तपासण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

उंदरांविषयी रंजक तथ्ये

उंदीर हा केवळ लहानसा दिसणारा प्राणी नाही, तर तो अत्यंत हुशार, चपळ आणि टिकाऊ असतो. खालील काही गोष्टी तुम्हाला नक्कीच अचंबित करतील –

1) वाढणारे दात: उंदरांचे पुढचे दात आयुष्यभर वाढत राहतात. जर ते वस्तू कुरतडत राहिले नाहीत, तर त्यांच्या दातांची लांबी १ ते २ इंचांपर्यंत वाढू शकते.

2)तीव्र स्मरणशक्ती: उंदीर एकदा एखादा मार्ग पाहिला की तो कधीच विसरत नाही. त्यामुळे प्रयोगशाळांमध्ये भूलभुलैय्यासारखे प्रयोग करताना त्यांचा उपयोग केला जातो.

3)अत्यंत लवचिक शरीर: मांजरांप्रमाणेच उंदरांचे शरीरही लवचिक असते. ५० फूट उंचीवरून पडले तरी त्यांना फारशी दुखापत होत नाही.

4)उत्तम पोहणारे: उंदीर पोहण्यातही तरबेज असतात. ते खोल पाण्यात सहज पोहू शकतात आणि लांब अंतर प्रवास करू शकतात.

5)गटात राहण्याची सवय: उंदरांना एकटे राहणे आवडत नाही. ते स्वतःचा एक मोठा समूह तयार करतात आणि त्यातील एखादा सदस्य आजारी पडल्यास त्याची काळजी घेतात.

6)रोग पसरवणारे जीव: उंदीर ३० हून अधिक घातक रोग पसरवू शकतात. प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, टायफस आणि हंता व्हायरस यांसारखे आजार उंदरांमुळे पसरतात.

7)अंगठ्याशिवाय बोटे: उंदरांना मानवासारखी पाच बोटे असली तरी त्यांना अंगठे नसतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनचे भारताला ‘प्रेमपत्र’; हा नक्की मैत्रीचा मुखवटा की धोरणात्मक सापळा?

 एक अद्वितीय प्राणी

उंदीर हा जगभर वेगवेगळ्या प्रकारे पाहिला जातो. तो धार्मिक, वैज्ञानिक आणि जैविक दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्राणी आहे. तो काही ठिकाणी पूजला जातो, तर काही ठिकाणी त्रासदायक मानला जातो. मात्र, त्याच्या हुशारीमुळे आणि अनुकूलन क्षमतेमुळे तो पृथ्वीवरचा एक यशस्वी प्राणी ठरला आहे. आजच्या जागतिक उंदीर दिनानिमित्त आपण उंदरांबद्दल अधिक माहिती मिळवली. त्यामुळे उंदीर फक्त कचरा कुरतडणारा जीव नसून प्रकृती आणि मानवतेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा घटक आहे, हे समजणे गरजेचे आहे.

Web Title: World rat day fascinating rat tales and 75 years of india ties nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 08:58 AM

Topics:  

  • lifestyle news
  • special news
  • special story

संबंधित बातम्या

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा
1

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा

National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?
2

National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP
3

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

Grey Hair: वयाच्या आधीच होताय म्हातारे? सफेद केसांमुळे हैराण! ‘हे’ घरगुती उपाय ठरतील रामबाण, त्वरीत करा सुरू
4

Grey Hair: वयाच्या आधीच होताय म्हातारे? सफेद केसांमुळे हैराण! ‘हे’ घरगुती उपाय ठरतील रामबाण, त्वरीत करा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.