
Dinvishesh
World Tourism Day 2026: जागतिक पर्यटन दिन दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश जागतिक स्तरावर पर्यटनाचे महत्त्व आणि त्याचा आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम यावर प्रकाश टाकणे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन संघटनेने (UNWTO) हा दिवस 1980 मध्ये प्रथम साजरा करण्यास सुरुवात केली. पर्यटन उद्योग हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा क्षेत्र असून, तो रोजगार निर्मिती, आर्थिक वाढ, आणि सांस्कृतिक आदानप्रदानाचा प्रमुख स्रोत आहे.
पर्यटनाने वेगवेगळ्या संस्कृती, परंपरा, आणि निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्याची संधी मिळते. या दिवसाचे महत्त्व वाढते कारण पर्यटनामुळे जागतिक एकात्मता वाढते आणि विविध देशांमधील परस्पर समजूतदारपणा वाढतो. 2023 च्या जागतिक पर्यटन दिनाचा थीम होता “पर्यटन आणि हरित गुंतवणूक,” ज्यामुळे शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे.