आयुष म्हात्रेकडे मुंबई टीमच्या कप्तानपदाची जबाबदारी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बुची बाबू क्रिकेट स्पर्धा २०२५ लवकरच अर्थात १८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने आयोजित केली आहे. तामिळनाडूमध्ये क्रिकेटचे जनक मानले जाणारे मोथावरापू वेंकट महिपती नायडू यांच्या नावावर असलेली बुची बाबू स्पर्धा पहिल्यांदा १९०९/१० मध्ये आयोजित करण्यात आली होती.
गेल्या हंगामात १२ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर ही स्पर्धा पुन्हा खेळविण्यात आली आणि आता या हंगामात चौदा संघ या स्पर्धेत सहभागी होतील. यावेळी तामिळनाडूचे दोन संघ प्रेसिडेंट इलेव्हन आणि टीएनसीए इलेव्हन आहेत. दरम्यान या चौदा संघापैकी एक संघ मुंबईचादेखील आहे आणि यासाठी टीमची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घेऊया संंघात कोणाचा समावेश करण्यात आलाय
या रेड बॉल स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे. १८ वर्षीय आयुष म्हात्रेला मुंबईचा कर्णधार बनवण्यात आले आहे. संघात सरफराज खान, हार्दिक तामोर, आकाश पार्कर आणि रॉयस्टन डायससारखे अनुभवी खेळाडू आहेत. यानंतरही आयुषला कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. १८ वर्षीय आयुष म्हात्रेची मुंबई क्रिकेटमध्ये चांगल्या खेळामुळे झपाट्याने वाढत आहे. गेल्या IPL हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पण करताना त्याने सर्वांना प्रभावित केले होते आणि त्याची घोडदौड चालू आहे. विरारचा हा मुलगा सर्वांचे मन जिंकताना दिसून येत आहे.
आयुष म्हात्रे हा भारतीय १९ वर्षांखालील संघाचा कर्णधारदेखील आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अलिकडेच इंग्लंडचा दौरा केला. भारताने तेथे एकदिवसीय मालिका जिंकली तर युवा कसोटी मालिका अनिर्णित राहिली. युवा कसोटीच्या चार डावांमध्ये आयुषने दोन शतके झळकावली. याशिवाय ८० धावांची एक खेळीही होती.
त्याच्या कारकिर्दीत त्याने आतापर्यंत ९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २ शतकांसह ५०४ धावा केल्या आहेत. त्याने ७ लिस्ट ए सामन्यांमध्ये ४५८ धावा आणि ७ टी-२० सामन्यांमध्ये २४० धावा केल्या आहेत. दरम्यान आता या टूर्नामेंटमध्ये आयुषच्या नेतृत्वाखाली संघ कशा पद्धतीने खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आयुष म्हात्रे (कर्णधार), मुशीर खान, दिव्यांश सक्सेना, सर्फराज खान, सुवेद पारकर (उपकर्णधार), प्रग्नेश कानपिल्लेवार, हर्ष आघाव, साईराज पाटील, आकाश पारकर, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), श्रेयसिंग, रोमांच, रोमांच, श्रेयसिंग, रोमांच, दिव्यांश, सिल्वेस्टर डिसूझा आणि इरफान उमैर.
शुभमन गिल ठरला चौथ्यांदा ICC Player of the Month चा विजेता! ‘या’ दोन मातब्बर खेळाडूंना दिला धोबीपछाड
१. बूची बाबू टूर्नामेंट कोणी सुरू केली?
बूची बाबूना ‘मद्रास क्रिकेटचे जनक’ मानले जाते. त्यांनी वार्षिक मद्रास प्रेसिडेन्सी मॅचेसची स्थापना केली, ज्याचा पहिला सामना त्यांच्या मृत्यूनंतर लगेचच आयोजित करण्यात आला. त्यांच्या सन्मानार्थ दरवर्षी बुची बाबू स्पर्धा आयोजित केली जाते.
२. बुची बाबू स्पर्धेत मुंबईचा कर्णधार कोण आहे?
आयुष म्हात्रे बुची बाबू स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व करेल. युवा आयुष म्हात्रे वार्षिक बुची बाबू स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व करणार आहे. १७ सदस्यीय संघात सरफराज खान आणि मुशीर खान यांचाही समावेश आहे