Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Hazare Trophy : देशांतर्गत क्रिकेटमध्ये 38 संघ येणार आमने-सामने; 135 सामने, अनेक दिग्गज एकमेकांविरुद्ध असणार; आता येणार खरी

विजय हजारे ट्रॉफी शनिवारपासून (21 डिसेंबर) सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण 38 संघ सहभागी होत आहेत. या कालावधीत अंतिम फेरीसह 135 सामने खेळवले जातील.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 20, 2024 | 05:58 PM
Vijay Hazare Trophy : देशांतर्गत क्रिकेटमध्ये 38 संघ येणार आमने-सामने; 135 सामने, अनेक दिग्गज एकमेकांविरुद्ध असणार; आता येणार खरी मजा

Vijay Hazare Trophy : देशांतर्गत क्रिकेटमध्ये 38 संघ येणार आमने-सामने; 135 सामने, अनेक दिग्गज एकमेकांविरुद्ध असणार; आता येणार खरी मजा

Follow Us
Close
Follow Us:

Vijay Hazare Trophy 2024-25 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली अलीकडेच सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकणाऱ्या मुंबई संघाचा पहिला सामना कर्नाटकशी होणार आहे. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेसारखे स्टार खेळाडू श्रेयसच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहेत. भारताच्या देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या विजय हजारे ट्रॉफी 2024 चा नवीन हंगाम शनिवारपासून (21 डिसेंबर) सुरू होत आहे. यावेळी स्पर्धेत एकूण 38 संघ सहभागी होत आहेत. फायनलसह एकूण 135 सामने खेळवले जाणार आहेत. देशातील विविध 20 ठिकाणी या स्पर्धेचे सामने खेळवले जातील. अलीकडेच सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकणारा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ आपल्या पहिल्या सामन्यात कर्नाटकशी भिडणार आहे.
सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे स्टार खेळाडू दिसणार स्पर्धेत
या सामन्यात श्रेयससोबत सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे स्टार खेळाडू दिसणार आहेत. मात्र, वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणे या स्पर्धेत खेळणार नाही. रहाणेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये फलंदाजीत चमकदार कामगिरी केली होती. तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. विजय हजारे यांच्यासाठी संघात निवड न झाल्याने त्यांनी एमसीएकडे रजा मागितली होती. स्पर्धेचा अंतिम सामना 18 जानेवारी 2025 रोजी खेळवला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पुढील वर्षी होणार आहे. या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवर भारतीय निवड समितीची नजर राहणार आहे.
हे संघ या गटातून खेळणार
वडोदरा बाद फेरीचे सामने खेळणार आहे. 9 जानेवारी 2025 पासून बाद फेरीचे सामने खेळवले जातील. संघांची 5 गटात विभागणी करण्यात आली असून तीन गटात 8 संघ असून दोन गटात सात संघ आहेत. सात साखळी फेऱ्यांनंतर अव्वल 10 संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. अ गटात झारखंड, ओडिशा, गोवा, आसाम, हरियाणा, मणिपूर, उत्तराखंड आणि गुजरातचे संघ आहेत, तर ब गटात मेघालय, आंध्र प्रदेश, राजस्थान, सिक्कीम, महाराष्ट्र, सर्व्हिसेस, हिमाचल प्रदेश आणि रेल्वेचे संघ आहेत. कर्नाटक, नागालँड, मुंबई, हैदराबाद, सौराष्ट्र, पंजाब, पुद्दुचेरी आणि अरुणाचल प्रदेश हे संघ क गटात आहेत, तर मिझोराम, तामिळनाडू, विदर्भ, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, चंदीगड आणि जम्मू-काश्मीर या संघांना ड गटात ठेवण्यात आले आहे. बिहार, बंगाल, केरळ, त्रिपुरा, मध्य प्रदेश, दिल्ली आणि बडोदा या राज्यांना ई गट मिळाला आहे.
पृथ्वी-संजू आणि मनीष पांडे दिसणार नाहीत
पृथ्वी शॉ, संजू सॅमसन आणि मनीष पांडेसारखे स्टार खेळाडू विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिसणार नाहीत. पृथ्वीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये भाग घेतला होता पण त्याची कामगिरी विशेष नव्हती त्याला विजय हजारे ट्रॉफीसाठी संघातून वगळण्यात आले होते, तर संजू सॅमसन आणि मनीष पांडेही फलंदाजीत छाप पाडू शकले नाहीत.
रहाणेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ४६९ धावा
अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 8 सामन्यात 165 च्या स्ट्राईक रेटने 469 धावा केल्या होत्या. या कालावधीत त्याचा डाव अनुक्रमे १३, ५२, ६८, २२, ९५, ८४, ९८ आणि ३७ धावांचा होता. या काळात त्याने पाच अर्धशतके झळकावली होती. अजिंक्य रहाणेने वैयक्तिक कारणांमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनमधून काही दिवसांची विश्रांती मागितली होती.

Web Title: 38 teams will face each other in vijay hazare 2024 25 trophy domestic cricket 135 matches many legends will be against each other now the real fun will come

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 05:21 PM

Topics:  

  • Hyderabad
  • Karnataka
  • Mumbai
  • Sanju Samson
  • Vijay Hazare Trophy 2024-25

संबंधित बातम्या

URAN : चलो बस अ‍ॅपवरून ऑनलाईन बुकींग करूनच प्रवास, उरण ते मुंबई आणि नवी मुंबई
1

URAN : चलो बस अ‍ॅपवरून ऑनलाईन बुकींग करूनच प्रवास, उरण ते मुंबई आणि नवी मुंबई

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही
2

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Mumbai Crime: ट्रान्सजेंडर गटाकडून 19 वर्षीय तरुणाचं अपहरण, जबरदस्तीने जेंडर सर्जरीचा धक्कादायक आरोप; मालाड येथील प्रकार
3

Mumbai Crime: ट्रान्सजेंडर गटाकडून 19 वर्षीय तरुणाचं अपहरण, जबरदस्तीने जेंडर सर्जरीचा धक्कादायक आरोप; मालाड येथील प्रकार

Mumbai Crime: भायखळ्यात दुर्दैवी अपघात! निर्माणधीन इमारतीत मातीखाली दबून दोन कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4

Mumbai Crime: भायखळ्यात दुर्दैवी अपघात! निर्माणधीन इमारतीत मातीखाली दबून दोन कामगारांचा मृत्यू, ३ जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.