38th National Games Competition, Uttarakhand 2024-25 : महाराष्ट्र संघाने 38 व्या नॅशनल स्पोर्ट्स कॉम्पिटीशनमध्ये पदकांचा चौकार मारत भरघोस पदकांची कमाई केली आहे.
हल्दवानी : उत्तराखंडात सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आज पदकाची चौकर झळकविला. 2 रौप्य व 2 कांस्यपदके जिंकून महाराष्ट्राने दिवस गाजविला. मिहीर आम्ब्रे यांनी रौप्यपदक पटकाविले. मुलींच्या रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्य पदक तर आदिती हेगडे हिला एक कांस्यपदकाची कमाई केली. सोलापूरच्या ओम अवस्थी याने दहा मीटर प्लॅटफॉर्म डायव्हिंग प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
पुण्याच्या मिहिर आम्रेची रौप्य कमाई
हल्दवानीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये जलतरण तलावावर पुण्याच्या मिहिर आम्रेने पुरूषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात तर नवी मुंबईच्या ऋषभ दास याने दोनशे मीटर फ्रीस्टाइल प्रकारात रौप्य पदकाचा करिश्मा घडविला. नाशिकच्या अदिती हेगडे हिने महिलांच्या 200 मीटर प्रैी स्टाईल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
मिहीर आम्ब्रे या महाराष्ट्राच्याच खेळाडूने 100 मीटर्स बटरफ्लाय क्रीडा प्रकारात रुपेरी यश संपादन केले. त्याला ही शर्यत पार करण्यासाठी 54.24 सेकंद वेळ लागला. मुलींच्या चार बाय शंभर मीटर फ्रीस्टाइल रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्य पदक मिळाले. अवंतिका चव्हाण अन्वी देशवाल, सान्वी देशवाल व अदिती हेगडे यांनी हे अंतर चार मिनिटे 2.17 सेकंदात पार केले.
महाराष्ट्राच्या आदिती हेगडे हिने 200 मीटर्स क्रीडा प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली तिला हे अंतर पार करण्यास दोन मिनिटे 9.53 सेकंद वेळ लागला कर्नाटकची देसिंधु धिनिधी (दोन मिनिटे 3.24 सेकंद) व दिल्लीची भाव्या सचदेव (दोन मिनिटे 8.68 सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकाचा मान मिळविला.
ओम अवस्थीने अप्रतिम कौशल्य दाखवीत दहा मीटर प्लॅटफॉर्म डायव्हिंग प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. यापूर्वीही त्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भरघोस पदके जिंकलेली आहेत. तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने सातत्याने सुवर्णपदके जिंकली आहेत. ओमने रेल्वेकडूनही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत अव्वल दर्जाची कामगिरी केलेली आहे. गतवर्षी, त्याने वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सोनेरी कामगिरी केली होती.
Web Title: 38th national games competition uttarakhand 2024 25 maharashtras got 4 medal quartet mihir ambes silver performance aditi om win bronze silver performance in relay race too