फोटो सौजन्य - Pakistan Cricket सोशल मीडिया
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या कसोटी सामना सुरु आहे. यांच्यामधील कसोटी सामना झाला या सामन्यात इंग्लंडच्या संघाने पहिल्याच इनिंगमध्ये सामना जिंकला होता. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये ३ सामान्यांची कसोटी मालिका आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये आता पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवून इंग्लंडच्या संघाकडे १-० अशी आघाडी आहे. पाकिस्तनाच्या संघाने इंग्लडविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये ५५२ धावा केल्या होत्या. त्यानंतर पहिल्याच सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या संघाने ८२३ धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये पाकिस्तानच्या संघाला इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या धावांचे लक्ष्य पूर्ण करता आले नाही कारण इंग्लंडच्या संघाने पहिला सामना एक इनिंग शिल्लक असताना ४७ धावांनी सामना जिंकला. आजपासून इंग्लड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे.
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचे ५० ओव्हर झाले आहेत. यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलं आहे. ५० ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या संघाने आतापर्यत १४६ धावा करत २ विकेट्स गमावले आहेत. अब्दुल्ला शफीक याने स्वतःचा विकेट लवकर गमावला. त्याने २८ चेंडूंमध्ये फक्त ७ धावा करून बाद झाला. तर पाकिस्तान संघाचा नवा कर्णधार शान मसूद सुद्धा संघासाठी फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने फक्त दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ चेंडूंमध्ये ३ धावा केल्या आहेत.
Going strong 🤜🤛
Fifties up for both Kamran and Saim 🏏#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/dlfqkRIqsM
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 15, 2024
सैम अयुबने संघासाठी मैदानात टिकून आहे. सैम अयुबने आतापर्यत १४४ चेंडूंमध्ये ७२ धावा केल्या आहेत. तर कामरान घुलामने सुद्धा सैम अयुबला साथ देत १३२ चेंडूंमध्ये ७४ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या संघासाठी पहिले दोन्ही विकेट्स जॅक लीचने घेतले आहेत. हा सामना पाकिस्तानच्या संघासाठी जिंकणे गरजेचे आहे. दुसरा कसोटी सामना जिंकणे गरजेचे आहे तरच त्यांना तिसरा सामना जिंकणे फायद्याचे ठरेल, मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानच्या संघाची कामगिरी फार काही चांगली नाही.