Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs WI : ६,६,६,१,६,६…वेस्ट इंडिजच्या फलंदाजाचे वादळ घेंघावले! इंग्लंडचा नंबर वन गोलंदाज नेस्तनाबूत; पहा Video

इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा टी-२० सामना ४ विकेट्सने जिंकला आहे. परंतु या सामन्यात वेस्ट इंडिजचे जेसन होल्डर आणि रोमारियो शेफर्ड यांनी तूफान फटकेबाजी करत इंग्लिश फिरकीपटूच्या एका षटकात ३१ धावा काढल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 10, 2025 | 03:46 PM
ENG vs WI: 6,6,6,1,6,6…West ​​Indies batsman storms! England's number one bowler is destroyed; Watch Video

ENG vs WI: 6,6,6,1,6,6…West ​​Indies batsman storms! England's number one bowler is destroyed; Watch Video

Follow Us
Close
Follow Us:

ENG vs WI : इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा टी-२० सामना ४ विकेट्सने आपल्या खिशात घातला. पण, संघाचा नंबर-१ फिरकीपटू आदिल रशीद हा सामना मात्र कायम लक्षात राहणार आहे. ब्रिस्टलमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचे दोन फलंदाज जेसन होल्डर आणि रोमारियो शेफर्ड यांनी तूफान फटकेबाजी करत इंग्लिश फिरकीपटूच्या एका षटकात ३१ धावा काढल्या आहेत.

या षटकात होल्डर आणि शेफर्ड या दोघांनी मिळून ५ लांब षटकार लगावले आहेत. एकेकाळी असे वाटू लागले होते की, आदिल रशीदचा टी-२० मधील हा सर्वात लाजिरवाणा विक्रम असेल. यापूर्वी, माजी भारतीय स्टार खेळाडू युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सलग ६ षटकार लगावले होते. त्याच्या या खेळीने क्रिकेट जगतात खळबळ उडाली होती.

हेही वाचा : रोहित शर्माकडील वनडेचे कर्णधारपद धोक्यात! विश्वचषक 2027 साठी BCCI नव्या योजनेच्या विचारात..

आदिल रशीदला धुतले..

वेस्ट इंडिजच्या डावात  १९ व्या षटकात ही तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने आदिल रशीदकडे चेंडू सोपविला होता. ज्याने आधी ३ षटकांत २८ धावा देऊन विकेट देखील घेतली होती. पण जेसन होल्डरने या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर षटकारांची हॅटट्रिक लगावली. त्यानंतर, त्याने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर रोमारियो शेफर्डने हल्ला चढवत पुढच्या दोन चेंडूंवर गगनचुंबी षटकार मारला लगावले आणि या षटकात एकूण ३१ धावा चोपल्या.

Holder & Shepherd go BIGGGGG!! – 5️⃣ massive sixes in one brutal over! 🔥🧨#ENGvWI #SonyLIV pic.twitter.com/7upGAx9qUJ

— Sony LIV (@SonyLIV) June 8, 2025

आदिल रशीदचा नकोसा विक्रम

ही षटक टाकल्यानंतर आदिल रशीद आता स्टुअर्ट ब्रॉडनंतर टी२० मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारा दुसरा इंग्लिश गोलंदाज ठरला आहे. २००७ च्या टी२० विश्वचषकादरम्यान, युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार मारून ३६ धावा वसूल केल्या होत्या.

हेही वाचा : ENG vs IND मालिकेत इरफान पठानला मिळणार काॅमेंट्री बाॅक्समध्ये एंन्ट्री! सिरीजमध्ये हे दिग्गज करणार समालोचन

आदिल रशीद सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. तो आयसीसी टी-२० क्रमवारीत देखील चौथ्या स्थानावर आहे. तथापि, आता त्याच्या नावावर एका षटकात ३१ धावा देण्याचा लाजिरवाणा  विक्रम जमा झाला आहे.

महेंद्रसिंग धोनी आयसीसीच्या फेम ऑफ द हॉलमध्ये सामील

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनी याला आयसीसी फेम ऑफ द हॉल यामध्ये सामील करण्यात आले आहे. भारताच्या कर्णधारासह इतर विदेशी खेळाडूंना देखील यामध्ये सामील करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन महान सलामीवीर खेळाडू मॅथ्यू हेडन आणि न्युझीलँडचा महान फिरकी गोलंदाज डॅनियम विक्टरी याला सामील करण्यात आले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि महान कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

Web Title: 666166west indies jason holders storm englands number one bowler destroyed watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • ENG vs WI

संबंधित बातम्या

ENG vs WI : 16 वर्ष जुना क्रिस गेलचा रेकाॅर्ड मोडला! इंग्लंडच्या सलामी जोडीचे नाव कोरले सुवर्ण अक्षरात
1

ENG vs WI : 16 वर्ष जुना क्रिस गेलचा रेकाॅर्ड मोडला! इंग्लंडच्या सलामी जोडीचे नाव कोरले सुवर्ण अक्षरात

ENG vs WI : T-20 सामन्यात 29 षटकार, 459 धावा! गोलंदाजांना धु धु धुतलं…वाचा अहवाल
2

ENG vs WI : T-20 सामन्यात 29 षटकार, 459 धावा! गोलंदाजांना धु धु धुतलं…वाचा अहवाल

ENG vs WI : जोस बटलरचं शतक हुकलं! तरीही इंग्लडने वेस्ट इंडीजचा 21 धावांनी केला पराभव
3

ENG vs WI : जोस बटलरचं शतक हुकलं! तरीही इंग्लडने वेस्ट इंडीजचा 21 धावांनी केला पराभव

टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर! वेस्ट इंडिजचा सामना होणार इंग्लड आणि आयर्लंडलविरुद्ध, 31 वर्षीय खेळाडूला केले कर्णधार
4

टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर! वेस्ट इंडिजचा सामना होणार इंग्लड आणि आयर्लंडलविरुद्ध, 31 वर्षीय खेळाडूला केले कर्णधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.