फोटो सौजन्य : BCCI
भारत विरुद्ध इंग्लड मालिकेसाठी काॅमेंट्री करणाऱ्याची यादी : भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे 20 जूनपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आता फक्त 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. टीम इंडिया ही शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली आता मैदानात उतरणार आहे. तर भारतीय संघाचे उपकर्णधार हे रिषभ पंतकडे सोपवण्यात आले आहे. भारतीय संघाकडून या मालिकेमधून मोठ्यापेक्षा आहेत भारताचा युवा संघ इंग्लंड विरुद्ध पाच सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाचे कर्णधार पद रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे.
आता भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या मालिकेमध्ये होणाऱ्या मालिकेमध्ये कॉमेंट्री कोण करणार यासंदर्भात यादी समोर आली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणारा सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग ही सोनी लिव्ह ॲपवर होणार आहे त्याचबरोबर जिओ हॉटस्टारवर देखील या सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत पाहायला मिळणार आहे.
WTC Final 2025 : फलंदाज ताकद दाखवणार की गोलंदाज कहर करतील, जाणून घ्या लॉर्ड्सच्या खेळपट्टीचा मूड
इंग्लिश कॉमेंट्रीच्या यादीमध्ये अनेक दिग्गज व्यक्तीमत्व यामध्ये असणार आहेत. 1983 मध्ये विश्वचषक विजेते त्याचबरोबर भारताचे स्टार फलंदाज सुनील गावस्कर हे इंग्लिश कॉमेंट्री करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर मायकल वॉन, चेतेश्वर पुजारा, नसीर हुसेन, मायकल अथट्रॅन, संजना गणेशन आणि हर्षा भोगले हे इंग्लिश कॉमेंट्री करताना दिसणार आहेत. हर्षा भोगले हे आयपीएल 2025 मध्ये देखील इंग्लिश कॉमेंट्री करत होते.
Sony Sports Network’s star-studded commentary team for the England series! 🏏🔥 pic.twitter.com/DeX1vwBlJI
— CricketGully (@thecricketgully) June 9, 2025
हिंदी कॉमेंट्रीबद्दल सांगायचे झाले तर इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या या सीजनमध्ये इरफान पठाण यांना कॉमेंट्री च्या यादीमधून वगळण्यात आले होते त्यानंतर मोठा वाद झाला होता. या यादीमध्ये आता त्याला सामील करण्यात आले आहे. हिंदी कॉमेंट्रीमध्ये अजय जडेजा, इरफान पठाण, आशिष नेहरा, विवेक रजदान, सभा करीम, आर पी सिंग, अर्जुन पंडित आणि गौरव कपूर हे हिंदी कॉमेंट्रीची यादी आहे.
आयपीएल 2025 मध्ये नवज्योत सिंह सिधू, हरभजन सिंह त्याचबरोबर अंबाती रायडू यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्याची अनेक वादग्रस्त वक्तव्य सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. हिंदी कॉमेंट्री जतिन सप्रु याला न घेता गौरव कपूरला स्थान मिळाले आहे, त्याला मागिल अनेक मालिकांमध्ये वगळण्यात आले होते.