रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Rohit Sharma ODI Captain : भारतीय कसोटी क्रिकेटमधून रोहित शर्माने निवृत्ती घोषित केलीय आहे. त्याआधी त्याने टी20 मधून निवृत्ती जाहीर केली होती. तो आता केवळ एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. परंतु, आता त्याला एकदिवसीय कर्णधारपद देखील गमवावे लागू शकते. रोहित शर्माची २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची खूप इच्छा आहे, परंतु तो बीसीसीआयच्या योजनेत बसत नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआय त्याच्या जागी दुसऱ्या कोणाचा कर्णधार म्हणून विचार करण्याच्या विचारात आहे.
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने कसोटी क्रिकेटच्या निवृत्तीनंतर एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार असल्याचे सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याबाबत द्विधा मनस्थित असल्याचे दिसून येत आहे. अनेक माध्यमांमध्ये असा दावा करण्यात येत आहे की, बीसीसीआय संघात बदल करण्याच्या विचरात आहे.
हेही वाचा : व्हिडिओ हटवल्याबद्दल Vijay Mallya चा मुलगा संतापला! बीसीसीआय-आयपीएलला फटकारलं, पहा Video
रोहितने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले तेव्हा बीसीसीआयला आशा होती की तो त्यासोबत एकदिवसीय क्रिकेटमधून देखील निवृत्त होईल. परंतु रोहितने तसे न करता तो एकदिवसीय क्रिकेट खेळत राहील असे त्याने सांगितले. अशा परिस्थितीत, आता बीसीसीआय स्वतः त्याचे एकदिवसीय कर्णधारपद काढून घेऊ शकते. खरंतर, रोहित सध्या ३८ वर्षांचा असून २०२७ च्या विश्वचषकाच्या वेळी तो ४० वर्षांचा असणार आहे. हे पाहता, बीसीसीआय त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेऊन एका तरुण खेळाडूला नवीन कर्णधार बनवण्याचा विचार करू शकते.
रोहितने २०२३ च्या विश्वचषकात शानदार कामगिरी केली आणि भारताला अंतिम फेरीत पोहोचवले, परंतु संघाला अंतिम सामन्यात विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. त्यानंतर, त्याने संघाला टी-२० विश्वचषक आणि २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता बनवले. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकल्यानंतर रोहितने स्पष्टपणे सांगितले होते की तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही. त्याने याबद्दल म्हटले होते की, “मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत नाही, जेणेकरून कोणताही गैरसमज पसरू नये.” असे तो बोलला होता.
बीसीसीआय एकदिवसीय संघात बदल करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. व्यवस्थापन भविष्याचा विचार करून एका तरुण खेळाडूकडे कर्णधारपद देण्याची इच्छा आहे. २०२७ च्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघ २७ एकदिवसीय सामने खेळणार आहे. अशा परिस्थितीत, संघात बदल करण्याची आणि नवीन कर्णधाराला तयारीसाठी वेळ देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे बोलेल जाता आहे.
हेही वाचा : WTC 2025 Final : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द झाला तर? वाचा हवामानाचा अहवाल
एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदासाठी सध्या भारतीय संघात अनेक खेळाडू दावा करू शकतात. सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची नावे आघाडीवर आहेत. सूर्या हा टी-२० संघाचा सध्याचा कर्णधार आहे. त्याच वेळी, शुभमन गिलला नवीन कसोटी कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच्याशिवाय, श्रेयस अय्यरने गेल्या काही काळापासून त्याच्या फलंदाजी तसेच कर्णधारपदाने आपली छाप पाडत आहे.