श्रीलंका क्रिकेट संघाचा फलंदाज दानुष्का गुनाथिलकाला ६ नोव्हेंबर रोजी सिडनी येथे एका महिलेवर बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने गुनाथिलकाला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निलंबित केले आहे अशातच या बलात्कारप्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे. गुनाथिलकालाने पीडितेवर बलात्कार करत असताना तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला होता.
पिडीत महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोघे टिंडर डेटिंग अॅपद्वारे भेटले होते आणि सिडनीतील एका बारमध्ये भेटण्यापूर्वी दोघांनी व्हॉट्सअॅपवर अनेक वेळा व्हिडिओ कॉल केला होता. जेव्हा ते एकत्र घरी जात होते, तेव्हा गुणथिलकाने तिला जबरदस्तीने किस केले. घरी पोहोचल्यानंतर क्रिकेटरने जवळीक होण्यापूर्वी कंडोम घालण्यास नकार दिला. त्यानंतर क्रिकेटपटूने तिचा तीनवेळा गळा दाबला. यावेळी पीडित महिनेले गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप गुनाथिलकावर लावले आहेत. गुंतिलकाका यांनी महिलेचा गळा एवढा जोरात दाबला की तिचे ब्रेन स्कॅन करावे लागले.
श्रीलंका क्रिकेट संघाचा फलंदाज दानुष्का गुनाथिलकाला याला सिडनीतील स्थानिक न्यायालयाने बलात्कार प्रकरणी जामीन देण्यास नकार दिला आहे.