
RCB च्या खरेदीसाठी नवा तगडा दावेदार मैदानात! (Photo Credit - X)
🚨NEW OWNER IN RACE TO BUY RCB ☑️ Welsh Fire – owned by Glamorgan Cricket Club and American tech billionaire Sanjay Govil are interested in buying RCB. (Telegraph UK) Follow and Support 👉 @RCBtweetzz pic.twitter.com/t8v1U3X2gj — Royal Champions Bengaluru (@RCBtweetzz) December 4, 2025
आरसीबीला खरेदी करण्याच्या शर्यतीत नवीन ‘भारतीय’ नाव
भारतीय-अमेरिकन उद्योगपती संजय गोविल यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला खरेदी करण्यासाठी रस दाखवला आहे. ते आरसीबीला खरेदी करण्यासाठी इंग्लंडमधील ग्लॅमॉर्गन क्रिकेट क्लबसोबत भागीदारी करू शकतात. गोविल यांच्याकडे आधीच दोन क्रिकेट लीगमध्ये संघ आहेत, जे त्यांनी कोट्यवधी रुपयांना खरेदी केले आहेत. ते द हंड्रेड लीगमध्ये वेल्श फायर (Welsh Fire) आणि मेजर लीग क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन फ्रीडम (Washington Freedom) या संघांचे मालक आहेत. हे दोन्ही संघ त्यांनी ग्लॅमॉर्गनसोबत भागीदारीत खरेदी केले होते. आता त्यांचे लक्ष आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय संघ असलेल्या आरसीबीवर आहे. संजय गोविल बिग बॅश लीगमध्येही एका संघावर लक्ष केंद्रित करत असून, आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या संघाचे मालकी हक्क मिळवण्यासही इच्छुक आहेत.
आरसीबी का विकले जात आहे?
‘डायजिओ’ (Diageo) ही कंपनी आरसीबीची सध्याची मालक आहे. गेल्या आयपीएलमधील विजयानंतर, संघ मोठ्या वादात अडकला होता. याच कारणामुळे त्यांनी संघ विकण्याचा निर्णय घेतला असावा. इंडियन प्रीमियर लीगमधील हा सर्वात मौल्यवान संघ आहे आणि तो विकणे डायजिओच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकते. डायजिओला आरसीबी अंदाजे २०,००० कोटी रुपयांना विकले जाईल अशी अपेक्षा आहे आणि त्यांना मार्च २०२६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची आशा आहे.
आयपीएल २०२६ साठी आरसीबीने कायम ठेवलेले खेळाडू
रजत पाटीदार, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिक सलाम, अभिनंदन सिंग, सुयेश शर्मा.