फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आकाश चोप्रा : आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रचंड सुरु आहेत. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय होता. मुंबई इंडियन्सच्या संघाचा कर्णधार पदावरून रोहित शर्माला काढून हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. आता मुंबई इंडियन्सचा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे. महेला जयवर्धने मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून संघामध्ये पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज मार्क बाऊचरच्या जागी महेला जयवर्धने मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. याआधी महेला जयवर्धनेचा मुंबई इंडियन्ससोबतचा कार्यकाळ खूप यशस्वी ठरला आहे.
मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेच्या प्रशिक्षणात मुंबई इंडियन्सने ३ वेळा विजेतेपद पटकावले. आता माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने महेला जयवर्धनेच्या मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएल मेगा लिलावात मुंबई इंडियन्सची रणनीती काय असू शकते? आकाश चोप्रा म्हणाले की, महेला जयवर्धनेचे पुनरागमन हे सूचित करते की मुंबई इंडियन्स जास्तीत जास्त ६ खेळाडूंना कायम ठेवेल. तो म्हणाला की, मुंबई इंडियन्सने आपल्या ६ खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी ७९ कोटी रुपये खर्च केले तर त्यात काही गैर नाही, तुम्ही तुमचे ६ सर्वोत्तम खेळाडू कायम ठेवाल. मुंबई इंडियन्सला त्यांचे ५ सर्वोत्तम खेळाडू कायम ठेवायचे आहेत. तरुण नेहल वढेरालाही ठेवा. आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, मुंबई इंडियन्समध्ये बदल सुरू झाले आहेत. महेला जयवर्धने परतले आहेत.
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, मुंबई इंडियन्स कोणत्याही किंमतीत आपला गाभा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. या संघात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा आणि इशान किशनसारखे खेळाडू आहेत. यानंतर अनकॅप्ड खेळाडूंमध्ये नेहल वढेरासारखे नाव आहे. तो म्हणाला की मुंबई इंडियन्सने आपला गाभा टिकवण्यासाठी ७९ कोटी रुपये खर्च केले तर तो वाईट पर्याय नाही. तुमच्याकडे सर्व नावे आहेत जी भारतीय आहेत आणि प्लेइंग इलेव्हनचा भाग असतील.