फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आयपीएल २०२५ च्या या नव्या सीजनमध्ये दमदार सुरुवात केली आहे. पहिला सामन्यात त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केले तर दुसऱ्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंगला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे. आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. मागील सीजनमध्ये संघाची कामगिरी काही खास नव्हती पण या सिझनमध्ये संघाच्या फलंदाजांनी तर कमालीची कामगिरी केलीच आहे त्याचबरोबर संघाच्या गोलंदाजांनी देखील दमदार कामगिरी करून दाखवली आहे.
आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसंघाचा माझी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झालेल्या विजयानंतर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली, आरसीबीने शुक्रवारी चेपॉक येथे सतरा वर्षांनी चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला. आरसीबीकडून खेळलेल्या डीव्हिलियर्सने त्याच्या पॉडकास्ट ‘एबी डीव्हिलियर्स ३६०’ मध्ये म्हटले आहे की, “यावेळी आरसीबी संघाचे संतुलन मागील हंगामांपेक्षा दहापट चांगले आहे.” तो म्हणाला, “गेल्या वर्षी आयपीएल लिलावात मी म्हटले होते की आरसीबीला संतुलनाची आवश्यकता आहे. ते गोलंदाज, फलंदाज किंवा क्षेत्ररक्षकांबद्दल नव्हते. ते आयपीएल संघ आणि पर्यायांमध्ये चांगले संतुलन राखण्याबद्दल होते.”
डिव्हिलियर्स म्हणाला, “जेव्हा मी भुवनेश्वर कुमारला पाहिले तेव्हा मला वाटले की तो खेळत नाहीये आणि नंतर दुसऱ्या सामन्यात तो संघात होता. तुम्हाला हेच हवे आहे. पहिल्या सामन्यात (केकेआर विरुद्ध) तो संघात नव्हता आणि दुसऱ्या सामन्यात तो दुसऱ्याच्या जागी संघात होता. संघाला आवश्यक असलेला हा संतुलन आणि खोली आहे.”
A win over defending champions KKR in Kolkata, and now a win vs CSK in Chennai. It’s been a good start to #IPL2025 for #RCB. Let’s talk about it all in today’s #360LIVE. Join in… https://t.co/kdnlrEmsD6
— AB de Villiers (@ABdeVilliers17) March 29, 2025
तो म्हणाला, “या स्पर्धेत आरसीबीची ही सर्वोत्तम सुरुवात आहे. केवळ निकालांच्या बाबतीतच नाही तर संघाच्या बाबतीतही. केकेआरला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणे आणि नंतर चेपॉकमध्ये चेन्नईला हरवणे खूप छान होते. आता यामुळे पॉइंट्स टेबलमध्ये पुढे जाण्याचा मार्ग सोपा होईल.”
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पुढील सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. हा सामना २ एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर म्हणजेच बंगळुरूच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर संघाचा चौथा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना ७ एप्रिल रोजी होणार आहे.