
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृती घेतल्यानंतर त्याने त्याचे 11 किलो वजन कमी केले. यावेळी रोहित शर्माकडून ही मेहनत घेण्याचे कारण म्हणजेच अभिषेक नायर. जेव्हा गौतम गंभीर याला भारतीय हेड कोच म्हणून निवडण्यात आले होते तेव्हा फलंदाजीसाठी कोच म्हणून अभिषेक नायर याला निवडण्यात आले होते. जे आधी आयपीएल त्याचबरोबर अनेक नव्या खेळाडूंना आणि दमदार खेळाडूंना घडवण्यामागचं कारण आहेत. रोहित शर्माच्या जवळच्या मित्राला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) मध्ये मोठे पद मिळण्याची शक्यता आहे.
हा मित्र दुसरा तिसरा कोणी नसून दिग्गज प्रशिक्षक अभिषेक नायर आहे, जो रोहितसोबत खेळला आहे आणि त्याला प्रशिक्षणही दिले आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत अभिषेक नायर टीम इंडियाचा सहाय्यक प्रशिक्षक होता, परंतु बीसीसीआयने त्याच्याकडून ही जबाबदारी काढून घेतली. त्याला बीसीसीआयने का काढले यामागचे कारण समोर आले नाही आता त्याच्या जागेवर नव्या प्रशिक्षकाची निवड करण्यात आली आहे. आता, तो आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो. आयपीएल २०२५ च्या मध्यात अभिषेक शर्मा केकेआर सेटअपमध्ये परतला.
Abhishek Nayar appointed as KKR Head Coach. We want Rohit Sharma in KKR too.@abhisheknayar1 please make it happen. 😭 pic.twitter.com/cDBxNgJpvT — Selfless⁴⁵ (@SelflessCricket) October 26, 2025
टीम इंडियाचा सहाय्यक प्रशिक्षक होण्यापूर्वीही तो केकेआरमध्ये होता आणि भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त होताच तो केकेआरमध्ये परतला. इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, केकेआरने गेल्या आठवड्यात अभिषेक नायरला कळवले की तो येत्या हंगामासाठी संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. तो केकेआरच्या अकादमी आणि संघाच्या सपोर्ट स्टाफचा बराच काळ सदस्य आहे. तो रोहित शर्मासारख्या खेळाडूंना वैयक्तिकरित्या देखील प्रशिक्षण देतो.
जुलैमध्ये, केकेआरने दिग्गज प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यापासून वेगळे झाले. २०२४ च्या संघाच्या जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींपैकी पंडित एक होते. गेल्या हंगामात, त्यांनी डब्ल्यूपीएल संघ, यूपी वॉरियर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले. याचा अर्थ असा होऊ शकतो की त्यांचे दोन वेगवेगळ्या फ्रँचायझींशी करार आहेत, परंतु ही महिला स्पर्धा आहे, त्यामुळे कोणतीही समस्या नसावी. मिनी-लिलावापूर्वी अभिषेक नायर अधिकृतपणे केकेआरचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारू शकतात. सध्या, नायर समालोचक म्हणून काम करतात.