टी-20 विश्वचषक 2022 या स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या कमाल फॉर्ममध्ये आहे. मागील जवळपास दोन वर्ष खराब फॉर्मशी झुंज देणारा कोहली आशिया चषक पासून पुन्हा आपल्या पूर्वीच्या फॉर्मात येऊन मैदानावर खेळू लागला आहे. विराट सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असला तरी विराटच्या मते इतर दोन महान खेळाडू क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेत.
नेदरलँड सोबत झालेला सामना जिंकल्यानंतर विराट कोहली स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, भारताचा महान माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिज लीजेंड सर विवीयन रिचर्ड्स हे दोघे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेत.
विराट कोहलीने गुरुवारी विराटने नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात नाबाद अर्धशतकीय खेळी केली. या कामगिरीसह विराटनं वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडीत काढलाय. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर पोहचलाय.
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात एकमेव श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेनं एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. जयवर्धनेनं टी-20 विश्वचषकाच्या 31 डावात 1 हजार 16 धावा केल्या आहेत. तर, विराट कोहलीच्या नावावर सध्या 989 धावांची नोंद आहे.