Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हो, Sachin Tendulkar वर अन्याय…”, अखेर २२ वर्षांनंतर अंपायर Steve Bucknor यांनी मागितली माफी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) चुकीच्या पद्धतीने बाद देणारे वेस्ट इंडिजचे माजी पंच स्टीव्ह बकनर (Steve Bucknor) यांनी अखेर आपली चूक जाहीरपणे मान्य केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 24, 2026 | 05:32 PM
अखेर २२ वर्षांनंतर अंपायर Steve Bucknor यांनी मागितली माफी (Photo Credit -X)

अखेर २२ वर्षांनंतर अंपायर Steve Bucknor यांनी मागितली माफी (Photo Credit -X)

Follow Us
Close
Follow Us:

  • “हो, Sachin Tendulkar वर अन्याय…”
  • अखेर २२ वर्षांनंतर अंपायर Steve Bucknor यांनी मागितली माफी
  • “माणसाकडून चुका होतात”; २२ वर्षांनंतर पश्चात्ताप
 क्रिकेट इतिहासातील सर्वात वादग्रस्त निर्णयांपैकी एकावर तब्बल २२ वर्षांनंतर पडदा पडला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) चुकीच्या पद्धतीने बाद देणारे वेस्ट इंडिजचे माजी पंच स्टीव्ह बकनर (Steve Bucknor) यांनी अखेर आपली चूक जाहीरपणे मान्य केली आहे. बकनर यांच्या या कबुलीमुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या मनातील जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

ब्रिस्बेन कसोटीतील ‘तो’ वादग्रस्त क्षण

ही घटना २००३-०४ मधील भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील ब्रिस्बेन कसोटीदरम्यान घडली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर होता. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीचा एक चेंडू सचिनच्या पॅडला लागला आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार अपील केले. अनुभवी पंच बकनर यांनी क्षणाचाही विलंब न लावता बोट वर केले आणि सचिनला ‘एलबीडब्ल्यू’ (LBW) बाद घोषित केले.

22 Years Later, Steve Bucknor Breaks Silence On Controversial Tendulkar LBW https://t.co/pcKtTyDVmh pic.twitter.com/G5p3XKoTcR — CricketNDTV (@CricketNDTV) February 24, 2026

रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की, चेंडू स्टंप्सच्या खूप वरून जात होता. सचिन केवळ ३ धावांवर असताना त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. प्रसिद्ध समालोचक टोनी ग्रेग यांनी त्यावेळी लाइव्ह कमेंट्रीमध्ये या निर्णयाचे वर्णन “भयानक चूक” असे केले होते. या एका चुकीच्या निर्णयामुळे सामन्याच्या निकालावरही मोठा परिणाम झाला होता.

क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! ICC Women’s T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK कधी भिडणार? घ्या जाणून

“माणसाकडून चुका होतात”; २२ वर्षांनंतर पश्चात्ताप

आता ७९ वर्षांचे असलेल्या स्टीव्ह बकनर यांनी वेस्ट इंडिज क्रिकेट अंपायर्स असोसिएशनला दिलेल्या मुलाखतीत ही चूक मान्य केली. “सचिन तेंडुलकरला एलबीडब्ल्यू देण्याचा निर्णय ही माझी मोठी चूक होती. आजही लोक मला त्या निर्णयाबद्दल विचारतात. मानवी जीवनात चुका घडतात आणि मी ही चूक प्रांजळपणे स्वीकारतो,” असे बकनर यांनी नमूद केले. तंत्रज्ञान (DRS) येण्यापूर्वी पंचांच्या एका निर्णयाचे वजन किती असायचे, याची जाणीव या विधानाने करून दिली आहे.

सचिन आणि बकनर वादाची मालिका

स्टीव्ह बकनर यांनी सचिनला चुकीचे बाद देण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. या घटनेच्या दोन वर्षांनंतर, भारत-पाकिस्तान सामन्यात अब्दुल रज्जाकचा चेंडू सचिनच्या बॅटला स्पर्श न करता गेला असतानाही बकनर यांनी त्याला बाद दिले होते.

सचिन तेंडुलकरनेही काही काळापूर्वी एका सत्रात या आठवणींना उजाळा दिला होता. बकनर यांच्या निर्णयाबद्दल विचारले असता सचिन मिश्किलपणे म्हणाला होता की, “मी फलंदाजी करत असताना कदाचित त्यांना (बकनर) बॉक्सिंग ग्लव्हज घालायला द्यायला हवे होते, जेणेकरून ते बोट वर करू शकणार नाहीत.”

२२ वर्षांनंतर आलेल्या या कबुलीमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक प्रकारचे समाधान मिळाले असले, तरी त्या निर्णयामुळे भारताने गमावलेली संधी क्रिकेट इतिहासात कायमची नोंदली गेली आहे.

IND vs ZIM : चेपॉकची खेळपट्टी भारतीय संघाचे टेन्शन वाढवणार? टीम इंडियासमोर असणार झिम्बाब्वेचे आव्हान, वाचा पिच रिपोर्ट

Web Title: 22 years later steve bucknor breaks silence on controversial tendulkar lbw

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • cricket news
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

“माझ्याकडे जगण्यासाठी फक्त ३-६ महिने उरले होते…”, मृत्यूच्या दाढेतून Yuvraj Singh कसा परतला? धक्कादायक वास्तव सांगितले
1

“माझ्याकडे जगण्यासाठी फक्त ३-६ महिने उरले होते…”, मृत्यूच्या दाढेतून Yuvraj Singh कसा परतला? धक्कादायक वास्तव सांगितले

महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशीव Cricket संघाचा ऐतिहासिक विजय; पुढील वर्षी यजमानपदाचा मानही प्राप्त
2

महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशीव Cricket संघाचा ऐतिहासिक विजय; पुढील वर्षी यजमानपदाचा मानही प्राप्त

KKR vs PBKS Pitch Report: कोलकाता – पंजाबच्या सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे खेळपट्टी; जाणून घ्या अहवाल
3

KKR vs PBKS Pitch Report: कोलकाता – पंजाबच्या सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे खेळपट्टी; जाणून घ्या अहवाल

RCB Beat CSK: चिन्नास्वामीवर आरसीबीचा ‘रॉयल’ धमाका! चेन्नई ‘सुपर फ्लॉप’; बंगळुरूचा 43 धावांनी दणदणीत विजय
4

RCB Beat CSK: चिन्नास्वामीवर आरसीबीचा ‘रॉयल’ धमाका! चेन्नई ‘सुपर फ्लॉप’; बंगळुरूचा 43 धावांनी दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.