AUS vs SA: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पा (Adam Zampa) याने खास कामगिरी केली आहे. या सामन्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या आणि घरच्या मैदानावर ५० विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. यासह तो ऑस्ट्रेलियाकडून घरच्या मैदानावर ५० पेक्षा जास्त एकदिवसीय विकेट्स घेणारा चौथा फिरकी गोलंदाज बनला आहे.
10 wickets in the last 5 ODI innings 👏
He removed the well-set De Zorzi and Tristan Stubbs today.
Adam Zampa – always among the wickets 💥#AUSvSA pic.twitter.com/EJZupk8iTO
— Cricketangon (@cricketangon) August 22, 2025
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४९.१ षटकांत २७७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना अॅडम झाम्पाने १० षटकांत ६३ धावा देत ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस आणि मार्नस लाबुशेन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
अॅडम झाम्पा हा गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. या सामन्यात पहिली विकेट घेताच त्याने ऑस्ट्रेलियातील मैदानांवर ५० एकदिवसीय विकेट्सचा टप्पा पार केला. त्याच्याआधी शेन वॉर्न, पीटर टेलर आणि ब्रॅड हॉग यांनीच घरच्या मैदानावर हा पराक्रम केला होता.
ऑस्ट्रेलियाकडून घरच्या मैदानावर ५० पेक्षा जास्त बळी घेणारे फिरकी गोलंदाज:
अॅडम झाम्पाच्या एकूण एकदिवसीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने आतापर्यंत ११३ सामन्यांमध्ये २८.६० च्या सरासरीने १९१ बळी घेतले आहेत. घरच्या मैदानावर त्याने ३१ सामन्यांत २७.६५ च्या सरासरीने ५२ बळी घेतले आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेट ५.३८ आहे.