Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AFG vs IRE: अटल-जादरानने गाजवलं मैदान! अफगाणिस्तानचा आयर्लंडवर दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात

Afghanistan Beat Ireland by 3-0 on series: अफगाणिस्तानने चौथ्या वनडेत आयर्लंडचा ४२ धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. सेदिकुल्ला अटल आणि इब्राहिम जादरान यांच्या २३१ धावांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने ३४३ धावा उभारल्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 13, 2026 | 03:16 PM
AFG vs IRE: अटल-जादरानने गाजवलं मैदान! अफगाणिस्तानचा आयर्लंडवर दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात
Follow Us
Follow Us:
  • अटल-जादरानने गाजवलं मैदान
  • अफगाणिस्तानचा आयर्लंडवर दणदणीत विजय
  • मालिकेत ३-० अशी आघाडी
अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. मालकेतील चौथा सामना १२ ऑगस्ट रोजी खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत ३४३ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात आयर्लंडने ३०१ धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानने हा सामना ४२ धावांनी जिंकला आणि मालिकाही आपल्या खिशात घातली. मालिकेतील अंतिम सामना १५ ऑगस्ट रोजी खेळला जाईल.

Mitchell Starc चा ऐतिहासिक विक्रम! हेराथला मागे टाकत बनला टेस्ट क्रिकेटचा नंबर-1 लेफ्ट-आर्म बॉलर

अटल -जादरानची शानदाक शतके

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर इब्राहिम जादरान आणि सेदिकुल्ला अटल यांनी डाव सावरला आणि आयरिश गोलंदाजांवर दबाव आणला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २२० चेंडूंमध्ये २३१ धावांची विक्रमी भागीदारी केली. ही अफगाणिस्तानची दुसऱ्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. तसेच, एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील ही दुसऱ्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.

इब्राहिम जादरानने उत्कृष्ट फलंदाजी करत ११ चौकार आणि एका षटकारासह त्याने ११८ चेंडूंमध्ये १०७ धावा केल्या. सेदिकुल्ला अटलने त्याहूनही अधिक आक्रमक फलंदाजी करत १२० चेंडूंमध्ये १४३ धावा केल्या. त्याच्या या तुफानी खेळीत १७ चौकार आणि चार षटकाराचा समावेश होता. अटल आणि जादरान यांच्यातील ही भागीदारी ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये कोणत्याही विकेटसाठी अफगाणिस्तानची तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे. इतकेच नव्हे तर, अफगाणिस्तानच्या एकदिवसीय इतिहासात एकाच सामन्यात दोन फलंदाजांनी शतके झळकावण्याची ही केवळ चौथी वेळ आहे.

शेवटच्या षटकांमध्ये अफगाणिस्तानचा डाव अडखळला

अटल आणि जादरान बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या डावाची गती थोडी मंदावली. दरविश रसूलीने १४ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या, तर अझमतुल्ला उमरझाई १२ चेंडूंमध्ये १५ धावा करून बाद झाला. कर्णधार रहमत शाह केवळ २ धावाच करू शकला. रशीद खानने १० चेंडूंमध्ये ११ धावा केल्या, तर हशमतुल्ला शाहिदी ७ धावा करून नाबाद राहिला. गझनफरला खाते उघडता आले नाही. अफगाणिस्तानने शेवटच्या दोन षटकांमध्ये तीन विकेट गमावले, ज्यामुळे संघाला ३५० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. आयर्लंडकडून बायरन मॅकडोनो याने तीन विकेट घेतले, तर मार्क रिचर्ड अडायर आणि गॅविन होई यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले.

आयर्लंडवर अफगाणिस्तानचा दणदणीत विजय

बेलफास्ट येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, आयर्लंडची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर अँड्र्यू बालबर्नीने शतकी खेळी केली. त्याने ११९ चेंडूमध्ये १०९ धावा ठोकल्या. कर्णधार पॉल स्टर्लिंगने २७ धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्टिस कॅम्फरचे शतक हुकले. त्याने ४६ चेंडूंमध्ये ८४ धावांची वादळी खेळी केली. मात्र, तो बाद होताच संपूर्ण संघ ढासळला. अफगाणिस्तानकडून यामिन अहमदझाईने ४ विकेट्स घेतले तर, राशीद खानने ३ विकेट्स घेतले. अझमतुल्ला ओमरझाईने २ विकेट्स घेतले. यासह अफगाणिस्तानने आयर्लंडवर दणदणीत विजय मिळवला.

शेवटच्या सामन्यात आयर्लंडला प्रतिष्ठा वाचवण्याची संधी

मालिकेतील सर्व सामने बेलफास्टमध्ये खेळले जाणार आहेत. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने आयर्लंडला अडचणीत आणले. त्यांनी दुसरा सामना ९८ धावांनी आणि तिसरा सामना तीन विकेट्सने जिंकला. आता, चौथा सामना जिंकून त्यांनी मालिका खिशात घातली. आता, १५ ऑगस्ट रोजी आयर्लंडला आपली प्रतिष्ठा वाचवण्याची शेवटची संधी मिळेल.

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया हरली तरी Gautam Gambhir यांची खुर्ची कायम? BCCI चा मोठा निर्णय

Web Title: Afg vs ire atal zadran 231 run partnership afghanistan beat ireland won series 3 0

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket team
  • Ireland Cricket Team
  • Rashid Khan

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेपाळने पठाणांचा गेम बिघडवला! अफगाणिस्तानला ५ विकेट्सने हरवलं; क्वार्टर फायनलचं समीकरण बदललं
1

Asian Games 2026: नेपाळने पठाणांचा गेम बिघडवला! अफगाणिस्तानला ५ विकेट्सने हरवलं; क्वार्टर फायनलचं समीकरण बदललं

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव
2

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.