फोटो सौजन्य - सोशल मीडिया
राशिद खानला गंभीर दुखापत : दोन महिन्यापूर्वी T२० विश्वचषक झाला आणि या विश्वचषकामध्ये अनेक संघानी जगाला आश्चर्यचकित केले होते. यामध्ये सर्वात चर्चेत असलेला देश म्हणजेच अफगाणिस्तान. अफगाणिस्तानच्या संघाने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आणि संघाने राशिद खानच्या नेतृत्वाखाली सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. आता अफगाणिस्तान संघाचा कर्णधार राशिद खान संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू आणि कर्णधार राशिद खान हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे उर्वरित सामान्यांमधून बाहेर पडला आहे.
राशिद खानच्या बाहेर पडल्याने ट्रेंट रॉकेटला मोठा धक्का बसला आहे. २५ वर्षीय राशिद खान शनिवारी सदर्न ब्रेव्हविरुद्ध शेवटच्या षटकात क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. राशिद खानच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तान संघही चिंतेत पडला आहे. अफगाणिस्तानला पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे आणि राशिद खान त्यांच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. राशिद खान वेळेवर फिट होतो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल. मीडियाच्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाचा फिरकी अष्टपैलू खेळाडू ख्रिस ग्रीनचा रशीद खानला पर्याय म्हणून समावेश करण्यात आला आहे. ट्रेंट रॉकेट्सला द हंड्रेडमध्ये बाद फेरीत स्थान मिळवण्याची संधी आहे कारण ते पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहेत. रॉकेट्सने आत्तापर्यंत ६ सामने खेळले आहेत, तीन जिंकले आणि तीन सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.
हेदेखील वाचा – रिषभ पंतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना दिला सलाम! सोशल मीडियावर खास पोस्ट
द हंड्रेडमध्ये राशिद खानची कामगिरी चांगली झाली आहे. लेग स्पिनरने पाच सामन्यांत १६ च्या सरासरीने ९ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय राशिदने ४४ धावा केल्या आहेत.
ट्रेंट रॉकेट्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राशिद खानशिवाय पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमलाही दुखापत झाली आहे. मात्र, पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर नाही. संघात पुनरागमन करण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे.