रशीद खान टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ६५० बळी घेणारा पहिला गोलंदाज. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
रशीद खानने द हंड्रेड २०२५ या स्पर्धेत ओव्हल इनव्हिन्सिबल्सकडून खेळत आहे. सध्या त्याच्याकडे ४८२ टी-२० सामन्यांमध्ये ६५१ बळी आहेत. रशीद जगभरातील वेगवेगळ्या लीगमध्ये खेळतो. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सचा भाग आहे. फोटो सौजन्य – सोशल मिडीया
रशीद हा क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपात ६५० बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडच्या भूमीवर खेळल्या जाणाऱ्या द हंड्रेड स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली आहे. फोटो सौजन - सोशल मिडीया
ओव्हल इनव्हिन्सिबलकडून खेळताना रशीदने लंडन स्पिरिटविरुद्ध एकूण २० चेंडू टाकले. यादरम्यान, अफगाण गोलंदाजाने फक्त ११ धावा देत ३ बळी घेतले. २० पैकी १५ डॉट बॉल टाकले. फोटो सौजन - सोशल मिडीया
रशीद खानने टी-२० क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. रशीद हा वेगवान क्रिकेटमध्ये ६५० बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. द हंड्रेड स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात त्याने ही कामगिरी केली. फोटो सौजन - सोशल मिडीया
लंडन स्पिरिटविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रशीदचे फिरकी गोलंदाज शिगेला पोहोचले होते. अफगाण गोलंदाजाने फक्त ११ धावा देत ३ विकेट घेतल्या. रशीदने आतापर्यंत खेळलेल्या ४८२ टी-२० सामन्यांमध्ये ६५१ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान, त्याने ४ वेळा एका सामन्यात ५ विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. त्याच वेळी, रशीदने १७ वेळा एका डावात ४ विकेट घेतल्या आहेत. फोटो सौजन - सोशल मिडीया