Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अफगाणी खेळाडूने मोडला विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम

गुरबाजने शारजाहमध्ये बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावून अनेक विक्रम रचले. त्याने विराट कोहलीसारख्या दिग्गजांना मागे टाकून सचिन तेंडुलकरची बरोबरी केली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 12, 2024 | 10:17 AM
फोटो सौजन्य - Afghanistan Cricket Board सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Afghanistan Cricket Board सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

रहमानउल्ला गुरबाजच्या रूपाने अफगाणिस्तान संघाला मजबूत सलामीवीर मिळाला आहे. रहमानउल्ला गुरबाज जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा संघ जिंकतो. एक प्रकारे रहमानउल्ला गुरबाज हे अफगाणिस्तानसाठी ट्रम्प कार्ड ठरत आहेत. याशिवाय रहमानउल्ला गुरबाज सातत्याने विक्रम करत आहेत. रहमानउल्ला गुरबाजने शारजाहमध्ये बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावून अनेक विक्रम रचले. त्याने विराट कोहलीसारख्या दिग्गजांना मागे टाकून सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. त्याने सचिनला एका विक्रमात पराभूत केले.

रहमानउल्ला गुरबाज हा आपला 23 वा वाढदिवस साजरा करण्यापूर्वी, त्या खास फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. ज्यांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 शतके झळकावली आहेत. गुरबाजने महान भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार क्विंटन डी कॉक यांची बरोबरी केली आहे. या खेळाडूंनी वयाच्या 22 व्या वर्षी 8 शतके झळकावली आहेत. गुरबाजने वयाच्या 22 व्या वर्षी 7 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतके झळकावणाऱ्या विराट कोहलीला मागे टाकले आहे.

हेदेखील वाचा – अक्षर पटेल होणार दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार? IPL 2025 मेगा लिलावापूर्वी मोठा खुलासा

वयाच्या 22 व्या वर्षी सर्वाधिक एकदिवसीय शतके

8 – रहमानउल्ला गुरबाज

8 – सचिन तेंडुलकर

8 – क्विंटन डी कॉक

7 – विराट कोहली

इतकेच नाही तर रहमानउल्ला गुरबाज सर्वात कमी वयात 8 वनडे आंतरराष्ट्रीय शतके करणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या पुढे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी कॉक आहे. डी कॉकने वयाच्या २२ वर्षे ३१२ दिवसांत ८ वनडे शतके ठोकली, तर रहमानउल्ला गुरबाजने वयाच्या २२ वर्षे ३४९ दिवसांत ही कामगिरी केली. या प्रकरणात रहमानउल्ला गुरबाजने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला मागे टाकले. सचिन तेंडुलकरने वयाच्या 22 वर्षे 357 दिवसात ही कामगिरी केली आणि विराटला 23 वर्षे 27 दिवस लागले. बाबर आझमने 23 वर्षे 280 दिवस वयात 8 वनडे शतके झळकावली.

𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃 𝐍𝐎. 𝐄𝐈𝐆𝐇𝐓 𝟖️ 𝐟𝐨𝐫 𝐆𝐮𝐫𝐛𝐚𝐳!!! 💯@RGurbaz_21 shines bright and brings up an outstanding 💯 in the series decider against @BCBtigers. 👏 A superb performance under pressure to mark his 8th ODI hundred! Terrific effort! 🔥#AfghanAtalan | #AFGvBAN pic.twitter.com/FPii6pE1My — Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 11, 2024

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या फलंदाजाने सर्वात कमी डावात 8 शतके झळकावली आहेत, याबद्दल बोलायचं झाल तर या यादीत हाशिम आमला अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या माजी सलामीवीराने 43 डावांत 8 शतके झळकावली होती. या यादीत दुसरे नाव बाबर आझमचे आहे. पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराने 44 डावांमध्ये हा पराक्रम केला होता. रहमानउल्ला गुरबाजला ही कामगिरी करण्यासाठी ४६ डाव लागले. अशा स्थितीत वेगवान 8 शतके पूर्ण करणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने इमाम उल हक आणि क्विंटन डी कॉक यांना मागे टाकले आहे, ज्यांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनुक्रमे 47 आणि 52 डावांमध्ये प्रत्येकी 8 शतके झळकावली होती.

Web Title: Afghanistan player rahmanullah gurbaz broke the record of virat kohli and sachin tendulkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 10:17 AM

Topics:  

  • cricket
  • Sachin Tendulkar
  • Team Afghanistan
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Smriti Mandhana पहिल्यांदाच दिसली एंगेजमेंट रिंग घालून; पलाश मुच्छलने या क्रिकेट स्टेडियममध्ये केला प्रपोज
1

Smriti Mandhana पहिल्यांदाच दिसली एंगेजमेंट रिंग घालून; पलाश मुच्छलने या क्रिकेट स्टेडियममध्ये केला प्रपोज

IND A vs SA : काही तासात वैभव सूर्यवंशी दिसणार अ‍ॅक्शनमध्ये, पाकिस्तानविरुद्ध कधी आणि कुठे पाहता येणार सामना?
2

IND A vs SA : काही तासात वैभव सूर्यवंशी दिसणार अ‍ॅक्शनमध्ये, पाकिस्तानविरुद्ध कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

IND vs SA : शुभमन गिलच्या दुखापतीबद्दल BCCI ने दिली मोठी अपडेट, सांगितले तो कधी मैदानात परतणार!
3

IND vs SA : शुभमन गिलच्या दुखापतीबद्दल BCCI ने दिली मोठी अपडेट, सांगितले तो कधी मैदानात परतणार!

CSK सोडल्यानंतर रवींद्र जडेजाची पहिली प्रतिक्रिया, राजस्थान रॉयल्सला आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्याचे दिले आश्वासन
4

CSK सोडल्यानंतर रवींद्र जडेजाची पहिली प्रतिक्रिया, राजस्थान रॉयल्सला आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्याचे दिले आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.