After Rishabh Pant Ajinkya Rahane Got The Captaincy of Mumbai Cricket Team will take over the command among the big Giants Players like Rohit Sharma, Yashasvi Jaiswal, Shivam Dubey
Captain Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला कर्णधारपद मिळाले आहे. IPL 2025 सुरू होण्यापूर्वी, रहाणेला मुंबईच्या रणजी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रहाणेच्या नेतृत्वाखालील १७ सदस्यीय संघात रोहित शर्माचीही निवड झाली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईला आपला पुढचा सामना जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळावा लागणार आहे.
ऋषभ पंतची कर्णधार म्हणून नियुक्ती
यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतची लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता रहाणेला रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल आणि शार्दुल ठाकूर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंमध्ये कर्णधार बनवण्यात आले आहे. गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार रहाणेला कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपदही मिळू शकते.
रोहित १० वर्षांनी रणजी खेळणार, १७ वर्षांनी हे होणार
रोहित शर्मा १० वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार हे देखील निश्चित झाले आहे. रोहितचीही १७ सदस्यीय संघात निवड झाली आहे. रोहित मैदानावर उतरताच इतिहास रचला जाईल. खरं तर, १७ वर्षांनंतर एक भारतीय कर्णधार रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. याआधी, शेवटी असा पराक्रम सौरव गांगुलीने केला होता. तेव्हा दादांनी कर्णधार असताना रणजी सामने खेळले होते.
रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीसाठी मुंबई संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोर (यष्टीरक्षक), आकाश आनंद (यष्टीरक्षक), तनुश कोटियन, शम्स. मुलानी, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूझा, रॉयस्टन डायस आणि कार्श कोठारी.
ऋषभ पंत लखनौचा बनला कर्णधार
२०२५ च्या आयपीएलमध्ये ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार असेल. गेल्या हंगामापर्यंत केएल राहुल लखनौचा कर्णधार होता, परंतु आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी त्याला सोडण्यात आले. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतसाठी ऐतिहासिक बोली लावली. लखनौने या स्फोटक यष्टीरक्षक फलंदाजाला २७ कोटी रुपयांना खरेदी केले होते. पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. आता पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा कर्णधारही बनला आहे.