
भारतीय संघाची सुरक्षा : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये T-20 विश्वचषकाचा (T-20 World Cup 2024) महामुकाबला होणार आहे. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेट जगतातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी आहेत. आज 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर आमनेसामने असणार आहेत. भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध झाला या सामन्यामध्ये भारताच्या संघ 8 विकेट्सने विजय मिळवला. तर पाकिस्तानचा पहिला संघ यूएसएविरुद्ध झाला या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने सुपर ओव्हरमध्ये सामना गमावला. त्यामुळे टीम इंडियाच्या खात्यामध्ये 1 विजय आहे तर पाकिस्तानने अजूनपर्यत विजयाचे खाते उघडले नाही. काही दिवसांपूर्वी आयएसआयएस या दहशतवादी संघटनेकडून धमकी देण्यात आली होती. (फोटो सौजन्य – बीसीसीआय X अकाउंट)
[read_also content=”कुलदीप यादव पाकिस्तानसाठी धोकादायक, नजर टाका आकडेवारीवर https://www.navarashtra.com/sports/kuldeep-yadav-dangerous-for-pakistan-team-india-is-generally-dominant-against-india-vs-pakistan-545033.html”]
या दोघांमधील सामन्यापूर्वी आयएसआयएस या दहशतवादी संघटनेकडून धोका होता, ही बाब लक्षात घेऊन खेळाडूंच्या सुरक्षेत अनेक पटींनी वाढ करण्यात आली आहे. सामन्यादरम्यान खेळाडूंना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे सुरक्षा पुरवली जाईल असे सांगण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध बऱ्याच वर्षांपासून खराब आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाचा ठरतो. या सामन्यापूर्वी सुरक्षेवर अनेक मोठे प्रश्न उपस्थित केले जात होते. पण, सामन्यापूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांनी खेळाडूंच्या तसेच सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेवर भर दिला आहे.
काय म्हणाले नासाऊ काउंटीचे पोलिस आयुक्त पॅट्रिक रायडर?
भारतीय संघाच्या आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसंदर्भात नासाऊ काउंटीचे पोलिस आयुक्त पॅट्रिक रायडर म्हणाले की, ही सुरक्षा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पातळीवर असेल. काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्वागतासाठी ज्या पद्धतीने भारत-पाकिस्तान सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती, तशीच व्यवस्था करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. ISIS च्या धमकीनंतर सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला होता.