
Ahamadabad मध्ये फाइव्ह स्टार हॉटेल्सच्या बांधकामांना वेग, 'हे' आहे मुख्य कारण!
कॉमनवेल्थ गेम्स 2030 आणि 2036 च्या ऑलिम्पिकच्या अहमदाबाद (Ahamadabad)च्या दावेदारीसाठी शहरात फाइव्ह स्टार हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट्सच्या बांधकामांनी वेग पकडला आहे.
अहमदाबाद महापालिकेच्या मते, 2025 मध्ये जवळपास 9 हॉटेल्सला आम्ही मान्यता दिली, ज्याचे बांधकाम सुरू आहे. 2026 मध्ये आणखीन 4 हॉटेल्सच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे. सिंधु भवन रोड आणि जवळपासच्या परिसरात 5 नव्या फाइव्ह स्टार हॉटेल्सचे प्रोजेक्ट येत आहेत, ज्यातील तिघांचे बांधकाम अगोदरच सुरू झाले आहे.
साबरमती नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर 200-300 खोल्या असलेला एक 16 मजली फाइव्ह स्टार हॉटेल, सोबतच एक कन्व्हेशन आणि एग्जिबिशन सेंटर बनवण्याची देखील योजना आखली आहे. संपूर्ण अहमदाबादेत इन्फ्रास्टक्चर प्रोजेक्ट्सदेखील डेव्हलप करण्यात येत आहे.
अहमदाबाद महापालिकेचे आयुक्त बंछानिधी पाणी यांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये अहमदाबाद महापालिका परिसरात आम्ही जवळपास 9 हॉटेल्सला मान्यता दिली आहे. ज्यांचे बांधकाम सध्या जोरात सुरू आहे. 2026 मध्ये आणखीन चार हॉटेल्सला मान्यता देण्यात आली असून त्यांचे बांधकाम सुरू झाले आहे. अहमदाबाद शहरातील विविध भागात मोठ्या संख्येने हॉटेल्सची निर्मिती होत आहे.
Asian Games 2026: बांग्लादेशला ‘हुतुतू’ समजेना! भारतीय कबड्डी संघाचा दणदणीत विजय
हॉटेल असोसिएशन, अहमदाबादचे अध्यक्ष नरेंद्र सोमानी म्हणाले की, कॉमनवेल्थ 2030 च्या तयारीला आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही पाहत आहो की, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आणि आमच्या हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट्स वरील कार्य जोरात सुरू आहे. आता सिंधु भवन रोडच्या जवळपास तीन मोठ्या हॉटेल्सच्या बांधकामांना सुरुवात झाली असून आणखीन दोन वा तीन हॉटेल्स उभारणीसाठी आम्ही पालिकेकडे परवानगी मागितली आहे.
तसेच रिव्हर फ्रंटवर एक मोठे कन्वेंशन सेंटर आणि एक मोठे फाइव्ह स्टार हॉटेलसोबतच विमानतळ परिसरात एक वा दोन हॉटेल बांधण्याचा आमचा विचार आहे. हॉटेलशिवाय अहमदाबाद शहरात प्रत्येक ठिकाणी रस्ते, पूल, जलजीवन योजना, ड्रेनेज, रेल्वे आणि सार्वजनिक परिवहन सेवेशी निगडीत बाबींवर काम सुरू झाले आहे.
Asian Games 2026: गर्वाने छाती फुलली! जय मीणाने जिंकले ‘Bronze’; सॉफ्ट टेनिसमध्ये प्रथमच…
कॉमनवेल्थ गेम्स 2030 चे आयोजन अहमदाबादेत होणार आहे. भारत सरकार 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी दावेदारी सादर करत आहे. जर भारताला 2036 ऑलिम्पिकचे यजमानपद मिळते, तर अहमदाबाद शहरातच क्रीडानगरी उभारण्यात येणार आहे. त्याचमुळे अहमदाबादमधील पायाभूत सुविधांवर जोमाने कार्य सुरू आहे.