Pahalgam Terrorist Attack: "He is an ISI dog..."; AIMIM's Waris Pathan gets angry at Pakistan's Shahid Afridi.
Pahalgam Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारत देशाला हादरा बसला आहे. अनेक स्तरावरून या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव देखील वाढताना दिसत आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा चचेत आला आहे. एआयएमआयएम नेते एकामागून एक शाहिद आफ्रिदीवर हल्ला करताना दिसत आहेत.काही दिवस आधी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी शाहिद आफ्रिदीला जोकर म्हटले होते. या विधानानंतर वारिस पठाण यांनी देखील आफ्रिदीवर जोरदार तोंडसुख घेतले आहे.
एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला आयएसआयचा ‘कुत्रा’ असे संबोधले आहे. त्यांच्या नेत्याच्या विधानावर पठाण म्हणाले की, आमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी आफ्रिदीला ‘जोकर’ म्हटले होते, पण मी त्यांना आयएसआयचा कुत्रा म्हणतो. एका माध्यम वाहिनीवर बोलत असताना वारिस पठाण म्हणाले की, दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीदरम्यान, आमच्या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सांगितले होते की आम्ही सरकारच्या समर्थनात उभे आहोत आणि सरकार जे काही पाऊल उचलेल त्याला विरोधी पक्ष पूर्ण पाठिंबा देणार आहे.
हेही वाचा : IPL 2025 : सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी! हा संघ होणार चॅम्पियन, इतिहास रचला जाणार
एआयएमआयएम नेते वारिस पठाण पुढे म्हणाले की, या संकटाच्या वेळी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उभे आहोत. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी देशाची १४० कोटी लोकसंख्या सरकारसोबत असल्याचे पठाण म्हणाले.
पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर एक वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर भारतात संताप व्यक्त करण्यात आला होता. शाहिद आफ्रिदीने आपल्या विधानात पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी भारतीय लष्कराला जबाबदार धरले होते. एवढेच नाही तर शाहिद आफ्रिदीने विंग कमांडर अभिनंदन यांची देखील खिल्ली उडवली होती. तीच्या या विधानांनातर भारतात संतापंछी लाट उसळली होती.
हेही वाचा : आता महिला क्रिकेटमध्ये Transgender players ला खेळता येणार नाही! ECB ने घेतला बंदीचा निर्णय..
पहलगाम दहशतवादी हल्ल्यांतर भारत सरकारने कठरो कारवाई करण्यास सुरवात केली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या आक्षेपार्ह विधानांनंतर त्यांचे सोशल मीडिया अकाउंट भारतात बंद करण्यात आले आहे. २ मे रोजी भारत सरकारने शाहिद आफ्रिदीसह अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या इंस्टाग्राम अकाउंटवर देखील भारतात बंदी घातली आहे. शाहिद आफ्रिदीसह बाबर आझम, शाहीन शाह, मोहम्मद रिजवान आणि हरिस रौफ यांचे इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर, पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या अर्शद नदीमचे देखील खाते सरकारकडून बंद करण्यात आले आहे.