
Will Anaya Bangar become Aryan again? Three months after the surgery, Sanjay Bangar's daughter took a big decision; Read in detail
Anaya Bangar took a big decision : माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलापासून मुलीमध्ये रूपांतरित झालेल्या अनाया बांगर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे ती खूप चर्चेत देखील असते. आता पुन्हा ती चर्चेत आली आहे. तिने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने संदेशाद्वारे आपला निर्णय शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, अनाया बांगर तिच्या जुन्या काळात परतण्याबद्दल बोलत असल्याचे दिसून येत आहे. येथे “जुने दिवस” म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर तिच्या पुनरागमनाबद्दलचे असल्याची माहीती आहे.
हेही वाचा : Photo : रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या पॉन्टिंगला टाकलं मागे
अनाया बांगरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अनाया बांगरने या व्हिडिओमध्ये, अनाया बांगरने तिच्या अलिकडच्या रिअॅलिटी शो, राईज अँड फॉल दरम्यान मिळालेल्या प्रेमाबद्दल प्रथम चाहत्यांचे आभार मानले आहे. त्यानंतर ती तीन महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेतून ती पूर्णपणे बरी झाल्याचे सांगितले. त्यानंतर तिने क्रिकेटमध्ये परतण्याबद्दल देखील भाष्य केले आहे. अनाया बांगरने चाहत्यांना सांगितले की यावेळी ती आर्यन म्हणून नाही तर अनया म्हणून क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. संपर्कात रहा.असे तिने लिहिले आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर, पूर्वी आर्यन बांगर म्हणून तिची ओळख होती, ती डावखुरी फिरकी गोलंदाज आहे. अल्पवयीन क्रिकेट स्पर्धांमध्ये, आर्यन बांगरने सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल सारख्या क्रिकेटपटूंसोबत क्रिकेट खेळले आहे. शिवाय, तिला विराट कोहलीकडून क्रिकेटच्या टिप्स देखील मिळाल्या आहेत.
तथापि, आर्यन बांगर आता पूर्णपणे अनया झाली असून तिच्या लिंग परिवर्तनानंतर, या वर्षी जुलैमध्ये तिने स्तन वाढवणे आणि श्वासनलिका शेव्ह शस्त्रक्रिया केली. तिने सांगितले की या शस्त्रक्रिया तिच्या परिवर्तनातील एक महत्वाचा टप्पा होता. ज्यामुळे तिला अधिक आत्मविश्वास आणि आनंद वाटू लागला असल्याचे ती सांगते.
हेही वाचा : ‘2027 चा विश्वचषक कारकिर्दीचा शेवट…’, एबी डिव्हिलियर्सचे Virat Kohli बद्दल खळबळजनक विधान
तथापि, आता आर्यन बांगर शस्त्रक्रियेतून पूर्णपणे बरी झाल्याचे तिने सांगितले आहे. अनया बांगरने आता क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. ती त्यासाठी तयार देखील आहे. तर, अनया आता भारतात महिला क्रिकेट खेळताना दिसणार का? याचे उत्तर रंजक असणार आहे.