एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
AB de Villiers on Virat Kohli’s retirement :नुकतीच ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची एकदिवस मालिका खेळून झाली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला. या मालिकेत सलग दोन सामन्यांमध्ये भोपळा न फोडू शकणाऱ्या विराट कोहलीने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ७३ धावांची नाबाद खेळी करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. दरम्यान आता विराटचा मित्र एबी डिव्हिलियर्सने त्याच्याबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेट कर्णधार एबी डिव्हिलियर्सला असा विश्वास वाटतो की विराट कोहलीमध्ये भरपूर क्रिकेट शिल्लक आहे, परंतु २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा असण्याची शक्यता आहे.त्यासोबत डिव्हिलियर्स म्हणाला की कोहलीला त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात पूर्ण पाठिंबा मिळायला पाहिजे.
एबी डीव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर विराट कोहलीबद्दल म्हटले आहे की, “मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की हा असा एक खेळाडू आहे ज्याचा तुम्ही उत्सव साजरा करू इच्छिता. त्याला त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्याच्या आयुष्यात संतुलन शोधू द्या. आता फक्त त्याचे उत्सव साजरा करा. त्याने खेळ कायमचा बदलला आहे. तो थोडे ‘धन्यवाद’ देण्यास पात्र असून आशा आहे की विराट आणखी पाच वर्षे खेळेल.”
डिव्हिलियर्स पुढे म्हणाला की, विराट कोहलीकडे अजून देखील पाच वर्षे उच्च-स्तरीय क्रिकेट खेळणे बाकी आहे, परंतु २०२७ चा विश्वचषक त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक संस्मरणीय निरोप असू शकणार आहे. आयपीएलची गोष्ट वेगळी आहे. आपण त्याला तीन, चार किंवा कदाचित पाच वर्षे खेळताना अजूनही पाहू शकतो, जरी ती खूप कठीण स्पर्धा असली तरी. तुम्ही त्यासाठी दोन किंवा तीन महिन्यांत त्याची तयारी करू शकता. विश्वचषक हा चार वर्षांच चक्र असून त्यासाठी खरोखर खूप तयारी करावी लागणार आहे.”
डिव्हिलियर्स पुढे सांगितले की, “विराट हा संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्या उपस्थितीमुळे तरुणांना जो आत्मविश्वास मिळतो तो तुलना न करण्यासारखा आहे. तो अपूरणीय आहे. त्याच्या आजूबाजूच्या खेळाडूंवर आणि इतर देखील त्याच्याकडे बघून त्यांना आत्मविश्वास मिळतो. कधीकधी तो चांगली कामगिरी करत नसला तरी देखील त्याचा प्रभाव प्रचंड असतो हे कधीही विसरायला नको.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीने सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८१ चेंडूत ७४ धावा केल्या. यावरून त्याच्यात खूप क्रिकेट शिल्लक आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होते.






