पठाण ब्रदर्समध्ये फूट : इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचे सामने सुरु आहेत. यामध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना सुरु होता. या सामन्यांमध्ये भारताचे दोन दिग्गज खेळाडू आमनेसामने आले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे दोन दिग्गज दुसरे तिसरे कोणी नसून भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू युसूफ पठाण (Yusuf Pathan) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) हे आहेत. सामान्यांच्या दरम्यान या दोघांमध्ये वादावादी पाहायला मिळाली. थोरल्या भावाने युसूफ पठाणच्या चुकीमुळे धाकट्या भावाला इरफान पठाण बाद झाला. त्यामुळे त्या दोघांमध्ये बाचाबाची आणि गरमागरमीने वातावरण पाहायला मिळाले. यानंतर इरफान पठाणला त्याच्या मोठ्या भावावर राग आला आणि त्याने आपला राग व्यक्त केला आणि नंतर पॅव्हेलियनच्या दिशेने परतला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामन्यात भारत चॅम्पियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या चॅम्पियन्सने हा सामना ५४ धावांनी जिंकला. इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स सामन्यात भारतीय संघ २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. दरम्यान, इरफानपठाणने 19व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक शॉट खेळला, जो हवेत गेला. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना झेल पकडता आला नाही, पण तरीही दोन्ही भावांमध्ये समन्वय चांगला नसल्यामुळे इरफानची विकेट घेतली. इरफान पठाणला दुसरी धाव घ्यायची होती. युसूफ पठाणलाही दुहेरी धावा काढायच्या होत्या आणि त्याने हाक मारली, पण नंतर तो थांबला, धावला आणि मग थांबला. इरफान परत येऊ शकला नाही आणि तो धावबाद झाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A heated moment between Pathan brothers at WCL.
India Champions needed 21 runs in the last 12 balls to qualify for Semi Finals. pic.twitter.com/hgIbhCtGFq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 11, 2024
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचा १५ वा सामना भारत चॅम्पियन्स आणि दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स यांच्यात खेळला गेला . या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ५४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकन चॅम्पियन्सने २० षटकांत ८ गडी गमावून २१० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ६ विकेट्सवर केवळ १५६ धावा करू शकला. भारतासाठी इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांनी शानदार फलंदाजी केली पण ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. मात्र, असे असतानाही भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे.