‘Afridi is barking because he ate dog meat..’, Irfan Pathan’s sensational revelation about the Pakistani player
Irfan Pathan’s clarification regarding Shahid Afridi : भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. यामागील कारण म्हणजे त्याची अलीकडील खळबळजनक मुलाखत. या दरम्यान त्याने त्याच्या कारकिर्दीत घडलेल्या अनेक घटनांबद्दल मोठ-मोठे खुलासे केले आहेत. ज्या खुलाशांनी खळबळ उडवून दिली आहे. ज्यामध्ये त्याने आयपीएलच्या समालोचनातून बाहेर पडण्यापासून ते पाकिस्तानी संघासोबत घडलेल्या घटनांपर्यंतच्या बऱ्याच गोष्टी उघड केल्या आहेत. मुलाखतीदरम्यान इरफान पठाणने पाकिस्तानसंघाबद्दलची खळबळजक असे खुलासे केले आहेत.
इरफानने मुलखातीदरम्यान सांगितले की, २००६ मध्ये त्याचे विमानात शाहिद आफ्रिदीसोबत भांडण झाले होते. या दरम्यान, शाहिदशी त्याचे एका मुद्द्यावर दीर्घकाळ संभाषण देखील झाले आहे. अनेकदा तो मैदानाबाहेर शाहिदशी भांडण करत असे. अनेक वेळा इरफान पठाणने पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीला पिछाडीवर टाकले आहे. मुलाखतीत त्याने पाकिस्तान संघ आणि त्याच्या खेळाडूंबद्दल बऱ्याच गोष्टी उघड केल्या ज्या खळबळ उडवून देणाऱ्या आहेत. याबद्दल जाणून घेऊया.
हेही वाचा : भारताच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टाॅप 5 महिला खेळाडू कोणत्या? वाचा यादी
अलीकडेच इरफान पठाणने एका चॅनलला मुलाखत दिली. यादरम्यान, पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीबद्दल सांगताना तो म्हणाला की, “२००६ च्या दौऱ्यात आम्ही कराचीहून लाहोरला विमानाने जात असताना दोन्ही संघ एकत्र प्रवास करत होते. आफ्रिदी आला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून माझे केस विंचरत मला विचारले, “बाळा, तू कसा आहेस?” यावर मी त्याला उत्तर दिले, “तू कधीपासून माझा बाप झालास?”
इरफान पुढे, म्हणाला की “त्यावेळी अब्दुल रझाक माझ्यासोबत बसलेला होता. मी त्याला तेव्हा विचारले की येथे कोणत्या प्रकारचे मांस मिळते? त्याने मला अनेक प्रकारच्या मांसाबद्दल माहिती दिली. मग मी विचारले की कुत्र्याचे मांस मिळते का? आफ्रिदी तिथे बसला होता. हे ऐकून रझाकला एकदम धक्का बसला आणि म्हणाला, अरे इरफान पठाण, तू असे का बोलत आहेस? मी म्हणालो की आफ्रिदीने कुत्र्याचे मांस खाल्ले असून तो बराच काळ भुंकत आहे. यानंतर आफ्रिदी यावर काही देखील बोलू शकला नाही.”
जर शाहिद आफ्रिदीविरुद्ध इरफान पठाण यांच्या विक्रमाबद्दल सांगायचं झालं तर, त्याने या खेळाडूला एकूण ११ वेळा माघारी पाठवले आहे. तसेच इरफान पठाणचा पाकिस्तानविरुद्ध खूप चांगला विक्रम राहिला आहे. इरफानने फलंदाजीत देखील पाकिस्तानी गोलंदाजांना चिंधड्या उडवल्या आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध एकूण ८०७ फटकावल्या आहेत. यामध्ये एका शानदार शतकाचा देखील समावेश आहे. गोलंदाजीत त्याने ६७ पाकिस्तानी फलंदाजांना माघारी पाठवला आहे.