फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण हा कॉमेट्री करताना बऱ्याच वेळा आपण पाहिले आहे. 2024 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषक त्याचबरोबर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने कॉमेंट्री केली होती. यावेळी त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती आणि त्यानंतर त्याला स्टार स्पोर्ट्सने कॉमेंट्रीच्या पाण्यामधून काढून टाकले होते. आता त्याने नुकताच एक इंटरव्यू दिला आहे यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणला आयपीएल २०२५ च्या समालोचन संघातून काढून टाकण्यात आले.
काही वृत्तांनुसार, वैयक्तिक समस्यांमुळे जाणूनबुजून खेळाडूंना लक्ष्य केल्याबद्दल आणि त्यांच्यावर टीका केल्याबद्दल त्याला काढून टाकण्यात आले. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवेळी कोणत्याही काॅमेंट्री करणाऱ्याने रोहित शर्माचे नाव घेतले नव्हते पण चाहत्यांमध्ये तो चर्चेचा विषय झाला होता त्यावेळी तो मुद्दा सोशल मिडियावर फारच रंगला होता. आता इरफानने यावर भाष्य केले आहे. २०२४-२५ मध्ये रोहित शर्माने फारच निराशाजनक कामगिरी केली होती. या कारणास्तव इरफान पठाणने त्याच्या कामगिरीवर टीका केली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माची तयारी सुरू! Video Viral
लल्लंटॉप शोमध्ये या विषयावर बोलताना पठाण म्हणाला, ‘रोहित शर्मा हा एक उत्तम पांढऱ्या चेंडूचा खेळाडू आहे पण त्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ६ होती. म्हणूनच आम्ही म्हटले होते की जर रोहित शर्मा कर्णधार नसता तर त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले नसते.’ इरफान पठाणला लल्लंटॉप शोमध्ये पाहुणा म्हणून पाहिले होते. त्याला विचारण्यात आले की आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूवर झालेल्या टीकेमुळे त्याला समालोचनातून काढून टाकण्यात आले आहे. उत्तरात पठाण म्हणाला की समालोचक म्हणून त्याचे काम सत्य सांगणे आहे, खेळाडूंचे रक्षण करणे नाही.
पठाण म्हणाला, ‘मला वाटते समालोचकांचे काम दृश्यमान नसलेली कथा बाहेर आणणे आहे. आम्ही सांगतो की हे का घडत आहे आणि आता काय होऊ शकते. हे आमचे काम आहे.’ तो पुढे म्हणाला, ‘जर एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत असेल तर आम्ही त्याचे कौतुक करू. जर तो करत नसेल तर आम्ही त्याची टीका करू. समालोचकांची खेळाडूंबद्दल नव्हे तर चाहत्यांबद्दल जबाबदारी असते.’ इरफान पठाणने त्याच्या विधानाद्वारे स्पष्ट केले की त्याला समालोचन करताना सत्य सांगायला आवडते आणि तो जाणूनबुजून कोणत्याही खेळाडूची प्रशंसा करू शकत नाही.