फोटो सौजन्य - X (ChessBase India)
Arjun Erigaisi vs Magnus Carlsen : नाॅर्वे चेस चॅम्पियन २०२५ चा काल शेवटचा राऊंड पार पडला. सामन्यात माजी वर्ल्ड चॅम्पियन आणि जागतिक क्रमावारिमध्ये पहिल्या स्थानावर असलेला मॅग्नस कार्लसन यांचा सामना या स्पर्धेमध्ये वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश याने नाॅर्वे चेस चॅम्पियनशिपमध्ये राज्य करत असलेला मॅग्नस कार्लसन याला पराभुत केले. त्यानंतर त्याची रिअॅक्शन फारच व्हायरल झाली होती. आता शेवटचा राऊंडनंतर मोठी बातमी समोर आली आहे, यामध्ये जागतिक क्रमावारीमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेला अर्जुन इरिगाईसी याने मॅग्नस कार्लसनला शेवटच्या राउंडमध्ये चेकमेट केलं आहे.
अर्जुन इरिगाईसी आणि मॅग्नस कार्लसन यांच्यामध्ये सामना पार पडला या सामन्यात भारताच्या अर्जुन इरिगाईसीने मॅग्नस कार्लसनला पराभुत केले आणि विजय मिळवला पण मॅग्नस कार्लसन हा या स्पर्धेचा विजेता ठरला आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा स्टार खेळाडू डी गुकेश हा तिसऱ्या स्थानावर राहिला तर मॅग्नस कार्लसन हा १६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या स्थानावर इटालियन-अमेरिकन बुद्धिबळ ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआना हा होता त्याने १० गेम खेळले आणि यामध्ये त्याने ४ सामन्यात विजय मिळवला तर ३ सामन्यात त्याचा पराभव झाला होता. तर ३ सामने अनिर्णयीत राहिले.
Arjun Erigaisi finishes the tournament with a win over the Champion – Magnus Carlsen! After a wild draw in the classical game, Arjun took down Magnus in the Armageddon game with the White pieces.
Arjun finishes 5th in the tournament scoring 13/30 points. While the event could… pic.twitter.com/qTg53f1VXF
— ChessBase India (@ChessbaseIndia) June 6, 2025
भारताचा स्टार डी गुकेश याने या स्पर्धेमध्ये १० सामने खेळले यामध्ये त्याला ४ सामन्यात विजय मिळाला होता तर ४ सामन्यात त्याचा पराभव झाला होता, त्याचबरोबर २ सामने अनिर्णयित राहिले होते. १४.५ गुणांसह तो गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला. त्याच्या या शेवटच्या पराभवामुळे तो नाॅर्वे चेस चॅम्पियन २०२५ होण्यापासुन हुकला. भारताचे दोन नाॅर्वे चेस चॅम्पियन २०२५ स्पर्धेमध्ये खेळाडु सहभागी झाले होते. अर्जुन इरिगाईसी याने या स्पर्धेमध्ये पाचव्या स्थानावर फिनिश केले.
अर्जुन इरिगाईसीने १० सामने खेळले यामध्ये त्याला फक्त २ सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर ३ सामन्यात त्याचा पराभव झाला आहे. तर ५ सामने अनिर्णयित राहिले होते.