फोटो सौजन्य - X
भारत अ विरुद्ध इंग्लड लायन्स दुसरा कसोटी सामन्याचा पहिला दिवस : भारताच्या अ संघाचा सामना सध्या इंग्लंड लायन्स विरुद्ध सुरू आहे. या दोन संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये ड्रॉ झाली. कालपासून म्हणजे ६ जूनपासून या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत पहिल्या दिनी सहा विकेट्स गमावून ३०९ धावा केल्या आहेत. पहिल्या दिनाच्या समाप्तीनंतर सध्या भारतासाठी तनुष कोटीयन आणि नितीश कुमार रेड्डी हे दोघे फलंदाजी करत आहेत.
पहिल्या दिनाच्या हायलाइट्स ही भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल हा स्टार ठरला. राहुलने पहिल्याच दिनी शतकीय खेळी खेळली. केएल राहुलने पहिल्याच दिनी इंग्लंडमध्ये 116 धावांची खेळी खेळली. पहिल्या दिनी भारतीय संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
भारताचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन या पहिल्या डावातही फेल ठरला. त्याचबरोबर यशस्वी जयस्वाल देखील मोठी कामगिरी करू शकला नाही. यशस्वी जयस्वाल यांनी 17 धावा केल्या तर अभिमन्यू ईश्वरण हा आजच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता त्याने फक्त 11 धावा केल्या आणि विकेट्स गमावली. मागील सामन्यांमध्ये द्विशतक झळकावणारा करून नायर याने सुरू असलेल्या सामन्यात चाळीस धावांची खेळी खेळली.
HUNDRED BY KL RAHUL. 🇮🇳
– What a start to the England campaign by KLR. He smashed a classy century Vs England Lions. pic.twitter.com/95jBMN6mFA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 6, 2025
केएल राहुलच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर त्यांनी या सामन्यात 116 धावांची खेळी खेळली यामध्ये त्याने एक षटकार आणि 15 चौकार मारले. त्याच्या या खेळीने भारताच्या संघाला पहिल्या दिनी चांगली मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाले. ध्रुव जुरेल यांनी देखील संघासाठी चांगली कामगिरी केली त्याने पहिल्याच दिने अर्धशतक झळकावले. जुरेल याने 87 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या त्यामध्ये त्याने सात चौकार मारले. शार्दुल ठाकूर हा बाद झाला त्याने या सामन्यात 19 धावा केल्या.
पहिला दिनाच्या समाप्तीनंतर सध्या नितीश कुमार रेड्डी फलंदाजी करत आहे त्याने 54 चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या आहेत तर तनुष कोटियान याने 18 चेंडूंमध्ये दोन धावा केल्या आहेत. भारताचा संघ पहिला डावामध्ये किती धावा करेल आणि तशी कामगिरी केलेली याकडे लक्ष असणार आहे.