फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा संघ सध्या दुबईमध्ये आशिया कप खेळत आहे तर टीम इंडियाने या स्पर्धेची सुरुवात दमदार केली आहे. भारताचा संघ एकिकडे आशिया कपसाठी लढत आहे तर दुसरीकडे भारताचे काही खेळाडू हे देशांतर्गत सामने खेळत आहेत. राज्यामध्ये त्याचबरोबर देशांमध्ये ठिकठिकाणी कमालीचे सामने खेळवले जात आहेत यामध्ये भारताच्या संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी देशांतर्गत सामन्यामध्ये खेळाडू काटकसर करत आहेत. भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडूलकरच्या मुलाच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
माजी महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने नुकतेच सानिया चांडोकशी लग्न केले. लग्नानंतर अर्जुन पहिल्यांदाच मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी आला आणि त्याने गोलंदाजीतही धुमाकूळ घातला. अर्जुन तेंडुलकरने एका स्थानिक स्पर्धेत खळबळ उडवून दिली. यादरम्यान अर्जुनने ५ विकेट्स घेतल्या.
Dubai Pitch Report : Pakistan vs Oman सामन्यात खेळपट्टीवर कोणाची चालणार मनमानी? जाणून घ्या सविस्तर
कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने डॉ. के. थिम्मप्पैया मेमोरियल टूर्नामेंट आयोजित केले होते. या स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरने गोव्याच्या वतीने अद्भुत गोलंदाजी केली. महाराष्ट्रासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध अर्जुनने आपल्या गोलंदाजीने कहर केला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर अर्जुनने विकेट घेतली. त्याने महाराष्ट्राचा सलामीचा फलंदाज अनिरुद्ध साबळेला पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्यानंतर अर्जुनने दुसरा सलामीचा फलंदाज महेशला बाद करून महाराष्ट्र संघाला बॅकफूटवर ढकलले.
महाराष्ट्राविरुद्ध शानदार गोलंदाजी करताना अर्जुन तेंडुलकरने पहिल्या डावात ५ बळी घेत खळबळ उडवून दिली. सलामी जोडीशिवाय अर्जुनने दिग्विजय पाटील, मेहुल पटेल आणि नदीम शेख यांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यामुळे महाराष्ट्राचा पहिला डाव १३६ धावांवर संपला. तुम्हाला सांगतो की, अर्जुन तेंडुलकर जवळजवळ ७ महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे.
Arjun Tendulkar Took Five Wicket in a Local Tournament after returning To The Cricket after 7 Month. pic.twitter.com/G7RWzxaGhI
— яιşнí. (@BellaDon_3z) September 10, 2025
या सामन्यात गोलंदाजीव्यतिरिक्त अर्जुन तेंडुलकरने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्जुनने पहिल्या डावात ४४ चेंडूंचा सामना केला आणि ३६ धावा केल्या. गोव्याच्या संघाने पहिल्या डावात ३३३ धावा केल्या. अभिनव तेजरानाने सर्वाधिक ७७ धावा केल्या.
आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर याला मुंबई इंडियन्सने विकत घेतले होते. पण त्याला आतापर्यत फक्त १ सिझनमध्ये काहीच सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. आतापर्यत त्याला भारतीय संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही त्याचबरोबर तो देशांतर्गत सामने देखील खेळताना कमी दिसला आहे.