Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईच्या प्रेमाला सीमा नसते! खुद्द अर्शद नदीमच्या आईने भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला घरी केले आमंत्रित; म्हणाली, “दोघेही मला….”

खरोखर आईच्या प्रेमाला सीमा नसते, याचा प्रत्यय आज आला. सर्व प्रकारच्या सीमा ओलांडत, कोणताही भेद न दाखवता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या अर्शद नदीमच्या आईने नीरज चोप्रालाच घरी आमंत्रित केले आहे. 

  • By युवराज भगत
Updated On: Aug 21, 2024 | 06:54 PM
Arshad Nadeem's mother has invited Neeraj Chopra to her home

Arshad Nadeem's mother has invited Neeraj Chopra to her home

Follow Us
Close
Follow Us:

Olympic Gold Medalist Arshad Nadeem Mother Invited Neeraj Chopra at Home : भारताचा स्टार भालाफेकपटून नीरज चोप्राला खुद्द पाकिस्तानच्या आॅलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट अर्शद नदीमच्या आईने घरी आमंत्रित केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये धमाकेदार कामगिरी करीत अर्शदने 92 मीटरचा मोठा थ्रो करीत गोल्डमेडल मिळवले. तर भारताच्या तर दुसरीकडे भारताच्या स्टार नीरज चोप्राने 89.34 मीटरचा थ्रो करून सिल्व्हर मेडल मिळवले. तेव्हाही या दोघांची खूप चर्चा झाली. आशिया खंडातील शेजारी राष्ट्र असणाऱ्या या दोन्ही देशातील खेळाडूंनी मोठी कामगिरी केली होती. त्यावेळी दोघांच्या आईचे वक्तव्य खूप चर्चेत आले होते.

दोघांच्या आईने या खेळाडूंना दिले आशीर्वाद

नीरज आणि अर्शद दोघांच्या आयांनी दोन्ही या दिग्गज खेळाडूंना आशीर्वाद देत, आम्हाला दोघेही मुलासारखेच असल्याचे म्हटले होते. आता अर्शद नदीमच्या आईने नीरज चोप्राला घरीच आमंत्रित केले आहे. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत, ते भावासारखे राहतात दोघे घरी एकत्रित जेवले तर मला आनंदच होईल, असेही तिने म्हटले आहे.

जॅवलीनमधील अंतिम सामना ठरला रोमांचक

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेकचा अंतिम सामना खूपच रोमांचक झाला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने नवीन ऑलिम्पिक विक्रम रचून या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले, तर नीरज चोप्राला हंगामातील सर्वोत्तम थ्रोसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या सामन्यात अर्शद नदीमने 92.97 मीटरचा सर्वाधिक लांब थ्रो करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. नीरज चोप्रा अंतिम फेरीत सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार होता आणि पात्रता फेरीत ८९.३४ मीटरच्या चमकदार प्रयत्नांसह द्वितीय स्थान मिळवले. पण, नशिबाने त्याला साथ दिली नाही. त्याने दुसरे स्थान मिळवून रौप्यपदक मिळवले, तर भारताचे सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

अर्शद नदीमची रेकॉर्डब्रेक कामगिरी

पाकिस्तानचा अर्शद नदीमने कालच्या सामन्यामध्ये ज्याप्रकारे कामगिरी केली आहे ती अविश्वसनीय आहे. त्याने पाकिस्तानला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिलं, परंतु त्यामागचं त्याची मेहनत सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. जानेवारी २०२४ मध्ये अर्शद नदीमकडे भाला घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते त्याला कोणी तरी स्पॉन्सरशिप द्यावी आणि तो भाला विकत घेऊ शकेल अशी तो मागणी करत होता काही काळानंतर त्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पैसे दिले.

अर्शद नदीमने १०० वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

अर्शद नदीम १०० वर्ष जुना रेकॉर्ड मोडून पाकिस्तानसाठी मोठी कामगिरी केली आहे. कालच्या या फायनलमध्ये नीरज चोप्रा शेर होता तर अर्शद नदीम हा सवाशेर होता. त्याने ९० मीटरचे अंतर एकदाच नाही तर दोनदा पार केलं. त्याने नीरज चोप्राचा म्हणजेच ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्टच्या ३ मीटर अंतर जास्त फेकले आहे आणि जेव्हा त्याने शेवटचा थ्रो केला तेव्हा त्याने ९१ मीटरचे अंतर पार केलं तेव्हापासून तो नीरजहून २ मीटर जास्त होता.

Web Title: Arshad nadeems mother invites golden boy neeraj chopra to her home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 06:52 PM

Topics:  

  • Neeraj Chopra
  • Paris Olympic 2024

संबंधित बातम्या

कोण आहे Sachin Yadav? जो Neeraj Chopra आणि अरशद नदीमला टक्कर देण्यासाठी आला अन् भाव खाऊन गेला
1

कोण आहे Sachin Yadav? जो Neeraj Chopra आणि अरशद नदीमला टक्कर देण्यासाठी आला अन् भाव खाऊन गेला

Neeraj Chopra: भारतीयांच्या पदरी घोर निराशा! नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर
2

Neeraj Chopra: भारतीयांच्या पदरी घोर निराशा! नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर

World Athletics Championship 2025: IND vs PAK अजून एक ड्रामा, नीरज चोप्रा-अर्शद नदीमचा महामुकाबला, जगाचे लक्ष
3

World Athletics Championship 2025: IND vs PAK अजून एक ड्रामा, नीरज चोप्रा-अर्शद नदीमचा महामुकाबला, जगाचे लक्ष

Neeraj Chopra चा ‘थ्रो’ पात्रता फेरीच्या आरपार! ‘गोल्डन बॉय’ ची जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक 
4

Neeraj Chopra चा ‘थ्रो’ पात्रता फेरीच्या आरपार! ‘गोल्डन बॉय’ ची जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.