Asia Cup 2025: Unwanted news for Shreyas Iyer and his fans! BCCI's big revelation regarding ODI captaincy
Asia cup 2025 : आशिया कप 2025 च्या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होऊन दोन दिवस उलटून गेले आहेत. सूर्यकुमार यादवकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर उपकर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड केली आहे. या दरम्यान 15 सदस्यीय भारतीय संघात भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरला वगळण्यात आले आहे. यामुळे काही दिग्गज आजी-माजी क्रिकेट खेळाडूंसह चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच श्रेयस अय्यरची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे चाहते खुश असल्याचे दिसू लागले होते. परंतु, आता बीसीसीआयच्या सचिवांनी या विषयावर दिलेल्या प्रतिक्रियेने अय्यरच्या चाहत्यांना धक्का बसेल.
हेही वाचा : पृथ्वी शॉचे एक शतक ठरले गुणकारी! नवनवीन ऑफर घेऊन IPL फ्रेंचायझींची लागली रांग; मिनी लिलावात दिसेल परिणाम
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी श्रेयसला एकदिवसीय कर्णधार बनवण्याचा दावा पूर्णपणे नकारला आहे. देवजित सैकिया यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, श्रेयस अय्यरला एकदिवसीय कर्णधार घोषित केल्याची बातमी हीच त्यांच्यासाठी एक बातमी आहे. सैकिया याबाबत म्हणाले की, या विषयावर कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही.
श्रेयस अय्यरला आशिया कपसाठी संघात स्थान न मिळाल्याने चाहते खूप निराश झाले होते, त्यानंतर जेव्हा तो एकदिवसीय संघाचा कर्णधार होणार अशी बातमी आली तेव्हा त्यांचे मनोबल वाढण्यास मदत झाली परंतु आता ती अल्प ठरली आहे. पण आता जेव्हा बीसीसीआयने ते नाकारले आहे, तेव्हा चाहत्यांना अधिक दुःख झाले असणार.
एकदिवसीय संघाच्या कर्णधारासाठी श्रेयस अय्यरचे नाव अद्याप चर्चेत आले नसले तरी तो एकदिवसीय संघाचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत आहे हे नकारून चालणार नाही. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची कामगिरी शानदार राहिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात त्याने ११ सामन्यांमध्ये ६६.२५ च्या सरासरीने ५३० धावा फटकावल्या आहेत. त्याने टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोठे योगदान दिले आहे. जरी ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत विजेता ठरला होता. या वर्षी, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील ४८ पेक्षा जास्त सरासरीने २४३ धावा केल्या होत्या. तो टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता.
हेही वाचा : मॅथ्यू ब्रीट्झकेने रचला इतिहास! पहिल्या चार ODI मध्ये केला ‘हा’ पराक्रम ; ‘या’ भारतीय दिग्गजाशी साधली बरोबरी
त्याच प्रमाणे त्याने आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात देखील पंजाब किंग्सचे नेतृत्व करत संघाला अंतिम फेरीत पोहचवले होते. तसेच तो त्याच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणार खेळाडू होता.