
Asia Cup 2025: 'Don't leave India, we need revenge...', Pakistani fan shouts after seeing Haris Rauf; Watch video
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘अंतिम सामन्याचा निकाल…’, भारताकडून दोन वेळा पराभूत होऊनही पाकिस्तानी प्रशिक्षकाची अकड कायम
आशिया कपमधील निर्णायक सामना २८ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या लढाईपूर्वी, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये, एक पाकिस्तानी चाहता पाकिस्तानी टीमचा वेगवान गोलंदाज हारिस रौफसमोर मोठ्याने ओरडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे की, तो भारताविरुद्ध पुन्हा पराभव सहन करू शकणार नाही. म्हणूनच तो रौफचा हात पकडताना दिसतो आणि मोठ्याने म्हणतो की, “भारताला सोडू नका, आम्हाला बदला हवा आहे.”
आशिया कप २०२५ मधील सुपर ४ सामन्यात काल २५ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश समोरासमोर आले होते. या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ११ धावांनी पराभव केला. या सामन्यात शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या, ज्यामुळे पाकिस्तानी संघाचा विजयच नाही तर पाकिस्तान संघाने अंतिम फेरीत देखील धडक मारली आहे. त्यानंतर हरिस रौफ स्टँडमध्ये गेला आणि काही पाकिस्तानी चाहत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका पाकिस्तानी चाहत्याने त्याचा हात घट्ट धरला आणि भारताविरुद्ध टिप्पणी केली.
A fan told Haris Rauf after reaching the final: ‘India ko nahi chhodna, badla chahiye’ 😂 #INDvsPAK pic.twitter.com/nyAdDNWtMM — CineSportsX (@SportsCraft381) September 26, 2025
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, पाकिस्तानी चाहत्याच्या डोळ्यात अश्रू आल्याचे देखील दिसत आहे. तो असे म्हणताना ऐकू येत आहे की, “आम्हाला बदला काढायचा आहे. आम्ही भारताला सोडणार नाही. देवासाठी.” तथापि, रौफने चाहत्याला प्रतिसाद दिला नाही, मात्र त्याने फ्लाइंग किस देऊन पुढे निघून गेला.
हेही वाचा : Gun celebrations : धोनी-कोहली आले धावून! साहिबजादा फरहानवरील ICC ची कारवाई टळली…