साहिबजादा फरहान(फोटो-सोशल मीडिया)
ICC hearing on gun celebrations : आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खूपच वादग्रस्त ठरला. पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने आशिया कप २०२५ मध्ये भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान त्याच्या सेलिब्रेशनशी संबंधित वाद पुढे आला आहे. साहिबजादा फरहानने आता या सेलिब्रेशनवर स्पष्टता दिली आहे. शुक्रवारी आयसीसीच्या सुनावणी दरम्यान त्याने सांगितले की त्याचे सेलिब्रेशन कोणत्याही प्रकारे राजकीय नव्हता आणि तो फक्त त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठीचे सेलिब्रेशन होते.
आयसीसीला स्पष्टीकरण देताना फरहान म्हटला की, काही लोक त्याच्या बंदुकीच्या सेलिब्रेशनचा चुकीचा अर्थ काढत आहेत. स्वतःचा बचाव करताना फरहानने धोनी आणि कोहलीच्या सेलिब्रेशनचा देखील उल्लेख केला आहे. तो म्हणाला की भारतीय महान खेळाडू एमएस धोनी आणि विराट कोहली यांनी देखील यापूर्वी अशाचप्रकारचे सेलिब्रेशन केले होते.
हेही वाचा : Asia cup 2025 : ४१ वर्षांत प्रथमच IND VS PAK अंतिम सामन्याचा थरार! जाणून घ्या आशिया कपचा इतिहास
भारताकडून फरहान आणि हरिस रौफ यांचे हावभाव चिथावणीखोर असल्याचे मानून आयसीसीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर फरहानने बंदुकीचे सेलिब्रेशन करण्याची कृती केली होती. त्याने भारताविरुद्ध आक्रमक सुरुवात केली होती. तथापि, भारतात ही सेलिब्रेशन संवेदनशील मानले जात आहे. विशेषतः, पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यांच्याची त्याचा संबंध जोडण्यात येत आहे. ज्यामुळे या वादात भर पडली आहे.
वेगवान गोलंदाज हरिस रौफला देखील टीकेचा सामना करावा लागला आहे. कारण, विकेट घेतल्यानंतर, त्याने ‘६-०’ हा हावभाव केला आणि लढाऊ विमान पाडल्याचे अनुकरण करण्यात आले होते. ज्याचा काहींनी राजकीय संदर्भ जोडून अर्थ लावला. आयसीसीच्या सुनावणीदरम्यान, रौफने दोषी नसल्याचे कबूल करतताना महटले आहे की, त्याच्या हावभावाचा भारताशी काही एक संबंध नाही.
रौफने ६-० म्हणजे काय आणि ते भारताशी कसे जोडण्यात येऊ शकते? असा प्रश्न विचारला. तेव्हा आयसीसी अधिकारी याचे स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी फरहान आणि रौफ दोघांनाही दंड अकरण्याची शक्यता आहे. हा दंड त्यांच्या सामन्याच्या फीच्या ५०% ते १००% पर्यंत असू असण्याची शक्यता आहे. तथापि, सध्या निलंबन किंवा बंदी घालण्याची काही एक शक्यता नाही.
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘अंतिम सामन्याचा निकाल…’, भारताकडून दोन वेळा पराभूत होऊनही पाकिस्तानी प्रशिक्षकाची अकड कायम