माइक हेसन(फोटो-सोशल मीडिया)
Pakistan head coach Mike Hesson : आशिया कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. भारत आणि पाकिस्तान संघ २८ सप्टेंबर रोजी अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तान संघाला गट टप्प्यात आणि त्यानंतर सुपर ४ सामन्यात असे दोन वेळा पराभूत केले आहे. भारताने आशिया कप स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. भारतासमोर पाकिस्तान या स्पर्धेत टिकू शकला नाही. तरी देखील पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी शब्द उधळले आहेत. ते म्हणाले की, अंतिम सामन्याचा निकालच महत्त्वाचा आहे.
भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानचा लीग सामन्यातमध्ये ७ विकेट्सने आणि सुपर-४ सामन्यात ६ विकेट्सने पराभव केला होता. आता, ४१ वर्षांत पहिल्यांदाच या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येणार आहेत. १९८४ मध्ये आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान याआधी एकदाही एकमेकांसमोर आलेले नाहीत. या सामन्यासाठी पाकिस्तानचे प्रशिक्षक माइक हेसन या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत.
बांगलादेशला ११ धावांनी पराभूत केल्यानंतर, जेव्हा हेसनला विचारण्यात आले की रविवारच्या अंतिम सामन्यासाठी खेळाडूंसाठी काय संदेश द्याल? तेव्हा ते म्हणाले की, “आम्हाला माहिती आहे की आम्ही १४ सप्टेंबर आणि २१ सप्टेंबर रोजी खेळलो आहेत. पण आता फक्त एक सामना महत्त्वाचा आहे असणार आहे तो म्हणजे अंतिम सामना आहे. आमचे लक्ष त्यावर असणार आहे. आम्ही योग्य वेळी आमचे सर्वोत्तम खेळण्याचा प्रयत्न करणार आहोत.”
हेसन पुढे म्हणाले की, “आता आम्हाला या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा लागणार आहे. आमचे संपूर्ण लक्ष ट्रॉफी जिंकण्यावर असायला पाहिजे आणि आम्ही नेहमीच त्याबद्दल बोलत असतो.”
बाहेरील जनमतावर संघाची प्रतिक्रिया तसेच भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान प्रक्षोभक हावभाव करणारे पाकिस्तानी खेळाडू, साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांच्याविरुद्ध आयसीसीच्या सुनावणीबद्दल विचारण्यात आले असता, प्रशिक्षक म्हणाले की, “माझा संदेश हा केवळ खेळावर लक्ष केंद्रित करणे आहे आणि आम्ही ते करत आहोत. तुम्हाला माझ्यापेक्षा या गोष्टींबद्दल अधिकची माहिती आहे.”
हेही वाचा : Asia cup 2025 : ४१ वर्षांत प्रथमच IND VS PAK अंतिम सामन्याचा थरार! जाणून घ्या आशिया कपचा इतिहास
माइक हेसन म्हणाले की, “मी लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, आपण फिरकी गोलंदाजाच्या हातातून येणारा चेंडू वाचू शकत नाही. मी त्या प्रश्नाचे उत्तर आधीच दिले आहे. जर तुम्ही तुमच्या हातातून निघून गेल्यानंतरही चेंडू नीट वाचू शकत असाल तर त्याचे काय नुकसान आहे?” असे देखील हेसन म्हणाले.