Asia cup 2025 : आशिया कपच्या या स्पर्धेत आज दूसरा सामना श्रीलंका आणि हॉंगकॉंग यांच्यात खेळला जात आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येत आहे. सामान्यापूर्वी श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यासीम मुर्तझा नेतृत्वाखालील हाँगकाँग संघ प्रथम फलंदाजी गोलंदाजी करताना दिसणार आहे.
श्रीलंकेने या स्पर्धेत पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करत आपली विजयी सुरवात केली होती. या सामन्यात गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली होती. आज खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात श्रीलंका हाँगकाँगविरुद्ध मोठा विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. मागील वेळी आशिया कप टी-२० स्वरूपात खेळला गेला होता. तेव्हा श्रीलंका संघाने जेतेपद आपल्या नावावर केले होते.
हेही वाचा : IND VS PAK : ‘आमचा पराभव, आम्ही कर भरू’, भारताकडून पराभूत पाकिस्तानी तज्ज्ञ बरळला, अमेरिकेला बनवले बाप..
आशिया कप २०२५ मध्ये हाँगकाँग संघाने आपले लागोपाठ दोन सामने गमावले आहेत. पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध ९४ धावांनी गमवावा लागला होता. तर दूसरा सामन्यात बांगलादेशने ७ विकेट्सने हाँगकाँगवर विजय मिळवला होता. हाँगकाँगच्या फलंदाजांसमोर श्रीलंकेच्या गोलदाजांचे आव्हान असणार आहे. नुवान तुषारा आणि दुष्मंथा चामीरा ही वेगवान गोलंदाज जोडी हाँगकाँगला उद्ध्वस्त करण्यास सज्ज आहे. त्यामुळे हाँगकाँगच्या फलंदाजांना सावध राहावं लागणार आहे.
श्रीलंका संघ खालीलप्रमाणे
श्रीलंका : चारिथ असलंका (कर्णधार), कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामडू मेंडिस, कामिल मिश्रा, दासुन शनाका, वानिंदु हसरांगा, नुवान तुषारा, मथीशा पाथिराना, दुशमंथा चमिरा, कमिंदू मेंडिस
हाँगकाँग संघ खालीलप्रमाणे
हाँगकाँग : झीशान अली (यष्टीरक्षक), अंशुमन रथ, बाबर हयात, निजाकत खान, कल्हान छल्लू, किंचिन शाह, चारिथ असलंका (कर्णधार), एजाज खान, एहसान खान, आयुष शुक्ला, अतिक इक्बाल
आशिया कप २०२५ मध्ये आतापर्यंत सहा सामने खेळवण्यात आले आहेत. आज संयुक्त अरब अमिराती आणि ओमान यांच्यात सातवा सामना सुरू आहे. ओमानने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व संयुक्त अरब अमिरातीच्या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या संघाने २० ओव्हर्स खेळत १७२ धावा केल्या आहेत. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीने ओमानला १७३ धावांचे लक्ष्य दिले आहे.