भारतीय संघ(फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup 2025 : रविवारी आशिया कपमध्ये (Asia Cup 2025) भारताने पाकिस्तान संघाला ७ विकेट्सने पराभूत केले. भारताकडून दारुण पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. या पराभवाने संतापलेले पाकिस्तानी तज्ज्ञ आणि अमेरिकेतील साजिद तरार यांनी भारताविरुद्ध अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. तरार हे सामन्यावर आपला राग करताना त्यांनी भारताच्या आर्थिक हितसंबंधांना हानी पोहोचवण्याबद्दल देखील भाष्य केले आहे.
तरार यांनी अमेरिकेला आवाहन करून म्हटले की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून थांबवेपर्यंत ते शांत बसणार नाहीत. त्यांनी डावा केला आहे की, भारत हा देश रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून नफा कमवत असून जर हे थांबले तर भारतात महागाईचे वादळ येणार आहे.
साजिद तरार यांनी असा देखील आरोप केला आहे, की भारताकडून दुबईमध्ये खेळवण्यात आलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याचा “व्यवसाय” म्हणून वापर करण्यात अलया आणि या सामन्यातून डॉलर्सची कमाई केली. विजयानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्याचे टाळले होते. त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत त्याला द्वेष वाढवणारे म्हटले आहे.
साजिद तरार पुढे म्हणाले की, “इतका द्वेष करणे चांगला नाही. जर भारतीय खेळाडूंना हस्तांदोलन करायचे नव्हते तर पाकिस्तानी संघानेही तेच करायला हवे होते. पण आता भारताकडून सर्वांना आपल्या व्यवसायाच्या जाळ्यात अडकवण्यात आले आहे.” तसेच तरार यांच्याकडून भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) क्षेत्रात काम करणाऱ्या बेरोजगार तरुणांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर त्यांनी टोमणा मारला की “भारत सरकार पकोडे उघडून त्यांना रोजगार देईल का?”
अमेरिकेकडून केली शुल्क आकारण्याची मागणी
तरार यांनी भारताच्या आर्थिक घडामोडींवर देखील भाष्य केले आहे. तरार म्हणाले की “भारत क्रिकेटमधून खूप पैसे कमवत आहे, पण अमेरिकेकडून शुल्कात जाणाऱ्या पैशाचे काय?” त्यांनी पुढे टोमणा मारला की “भारताला दोन्ही हातामध्ये लाडू हवे आहेत, जर ते हरले तर ते एक निमित्त ठरते, जर ते जिंकले तर टो मात्र एक उत्सव ठरतो.”